Breaking

मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१

*कागलच्या डी.आर.माने महाविद्यालयात इतिहास विभागाच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त व्याख्यान संपन्न*


डी. आर. माने कॉलेजमध्ये व्याख्यानाचे आयोजन


प्रा. मेहबूब मुजावर : विशेष प्रतिनिधी


       २८ नोव्हेंबर महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून इतिहास विभाग व इतिहास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ' *महात्मा फुले यांची धर्म* *चिकित्सा'* या विषयावर  व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. काशिलिंग गावडे (प्रमुख,इतिहास विभाग,बाबा नाईक महाविद्यालय कोकरूड) व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.आबासाहेब चौगले हे होते.      

   डॉ. गावडे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, महात्मा फुले यांनी धर्माची चिकित्सा करण्याची वेगवेगळी कारणे सांगून स्त्री शिक्षणाविषयी महात्मा फुले यांच्या विचारांची सकल माहिती दिली.त्यांच्या मते स्त्रीयांना शिक्षण दिल्याने माहेरचे व सासरचे अशी दोन्ही कुटुंबे सुधारतात. तसेच स्त्रियांना  मानसन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला.म.फुले यांनी हिंदू धर्मावर कठोर अशी टीका केली. धर्माची चिकित्सा करण्याचे  आव्हानात्मक काम जे आजपर्यंत कोणालाही करता आले नाही ते महात्मा फुलेंनी करून दाखविले. त्यांनी समाज सुधारणेची सुरुवात आपल्या घरापासून केली. समाजात असणारी  अंधश्रद्धा, लोकभ्रम व कर्मकांड नष्ट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. डॉ. काशिलिंग गावडे यांच्या व्याख्यानाचा वैशिष्ट्य म्हणजे अभ्यासपूर्ण व संदर्भासह उत्तम व्याख्यान दिल्याने उपस्थित  विद्यार्थ्यांना एक वैचारिक मेजवानी मिळाली.  

     या कार्यक्रमातील उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक करताना  इतिहास विभाग प्रमुख डॉ.संतोष जेठिथोर यांनी कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट केला.प्रा.कल्पना गुरव  यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.तसेच कार्यक्रमाचे नेमके आभार प्रा.लतिका सावेकर यांनी मानले. तर उत्तम व सूत्रबद्ध सुत्रसंचलन प्रा.संदिप वाडीकर यांनी केले. 

   याप्रसंगी प्रा.आदिनाथ गाडे, प्रा. सुशिलेंद्र मांजरडेकर, प्रा. विजय कांबळे, प्रा. प्रताप देशमुख आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

२ टिप्पण्या: