Breaking

मंगळवार, २ नोव्हेंबर, २०२१

*अत्यंत धक्कादायक ! जयसिंगपुरात दुचाकीस्वारावर अज्ञात इसमाचा चाकूहल्ला ; संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार*


जयसिंगपुरात दुचाकीस्वारावर हल्ला


प्रविणकुमार माने : उपसंपादक


     जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सांगली कोल्हापूर मार्गावरील हॉटेल अजिंक्य जवळ खुनी हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सदर घटना सोमवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडल्याची माहिती समोर येत आहे. या गुन्हेगारी घटनेत  एकजण गंभीर जखमी झाला असून त्याला 108 रुग्णवाहिकेतून उपचाराकरिता सांगली सिव्हिल येथे नेण्यात आले आहे.

     प्राप्त झालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकी वरून जात असलेल्या एका युवकावर हत्याराने पाठीमागून येऊन पायावर व मांडीवर हल्ला करून जखमी केले आहे.या झाल्याने घटनास्थळी रक्ताने जमीन माखली होती. घटनास्थळी या वर्दळीच्या मार्गावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. जयसिंगपूर पोलीस पोहोचण्यापूर्वीच जखमींला उपचाराकरिता दाखल केले होते. या जखमी इसमाची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे. जखमी व मारेकऱ्यांची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही आणि पोलीस अधिक तपास करीत आहेत.

      घडलेल्या या घटनेने  भितीदायक वातावरण निर्माण झाले असले तरी जखमी व मारेकऱ्यांच्या नावे व घटनेच्या कारणाबाबत माहिती घेण्यामध्ये लोकांच्यामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा