Breaking

बुधवार, ३ नोव्हेंबर, २०२१

*आनंदवार्ता ! सोन्याच्या दरात घट ; वार्षिक घसरण ₹ ४००० इतकी*

 

सोन्याच्या दरात घसरण


गीता माने  : सहसंपादक


   भारतासह अशिया खंडातील नागरिकांना सर्वात प्रिय मौल्यवान धातू म्हणजे सोने होय. विशेष करून भारतीय महिलांना सुवर्णालंकार खूप आवडतात. बहुतांशी सणासुदीला, लग्न सोहळा व शुभमुहूर्तावर सोन्याला अधिक मागणी असते. दिवाळी म्हटलं की,सोने- चांदीला प्रचंड मागणी दिसून येत असते अशावेळी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे यामध्ये सोन्यामध्ये जवळपास ₹ ४०००/ नी घट झाली असून चांदी मधेही ही मोठी घट झाली आहे. 

     दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सोने-चांदीचे आजचे दर जाहीर झाले आहेत. चांदीच्या दरातही मोठी घसरण पाहायला मिळाली. मल्टी कॉमोडिटी एक्सचेंजवर १० ग्रॅम सोन्याची किंमतीत अंशतः वाढ झाली असली तरी आता २४ कॅरेट सोन्याचा दर हा ₹ ४८२७० इतका आहे.

     तसेच चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून चांदीच्या दर  ₹६३२०० इतकी नोंद झाली आहे. ऑक्टोबर २०२० नुसार गेल्या वर्षावर नजर टाकली तर सध्या तरी सोने ₹ ४००० पर्यंत स्वस्त आहे. गेल्या वर्षी या दिवशी MCX वर १० ग्रॅम सोन्याची किंमत ₹५२२२० रुपये होती, बुधवार दिनांक ३ नोव्हेंबर २०२१ रोजी अर्थात आज २२ कॅरेट सोन्याची किंमत ₹ ४५९७० इतकी आहे.

      सोने खरेदीदारांना या दिवाळीचा मुहूर्त त्यांच्यावर पथ्यावर पडणार आहे असे दिसून येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा