लाभार्थी विद्यार्थ्यांना लसीकरण देताना |
मालोजीराव माने : कार्यकारी संपादक
जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरमध्ये " मिशन युवा स्वास्थ्य " अभियानांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थी - विद्यार्थिनी, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांच्यासाठी कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून प्रा.आ. केंद्र जयसिंगपूरचे प्रसिद्ध धन्वंतरी डॉ. पांडुरंग खटावकर हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुरत मांजरे होते.
सुरुवातीस प्राचार्य डॉ.सुरत मांजरे यांनी लसीकरण मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे, मान्यवर,लसीकरण लाभार्थी व उपस्थित घटकांचे स्वागत केले. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.मांजरे म्हणाले की, जयसिंगपूर कॉलेज नेहमीच विद्यार्थी केंद्रबिंदू मानून त्याच्या कल्याणासाठी व हितार्थ कार्य करत असते. तोच धागा धरून शासनाचे हात बळकट करणे व कोरोना मुक्तीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महाविद्यालयात १००% लसीकरण मोहीम राबवली जात आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.पांडुरंग खटावकर म्हणाले,आपण कोरोना निघून गेल्याच्या भ्रमात असून जगातील महत्त्वाच्या देशांमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे त्याची शक्यता भारतात देखील आहे. त्यामुळे जयसिंगपूर शहर किंबहुना जयसिंगपूर कॉलेज कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी शासनाच्या नियमांना अधीन राहून तसेच 100% लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे अशा प्रकारे मौलिक मार्गदर्शन केले.
जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि प्राथमिक आरोग्य केंद्र जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक १७, नोव्हेंबर २०२१ रोजी "मिशन युवा स्वास्थ्य" अभियानांतर्गत महाविद्यालयीन स्तरावर कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी जे Covid-19 प्रतिबंधात्मक लस घेतलेली नाही किंवा जे दुसऱ्या डोससाठी पात्र आहेत त्यापैकी ३२ जणांना कोविडशिल्ड लसीचे डोस देण्यात आले.
या लसीकरण मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे मा.सुनिल आलासकर, डाटा ऑपरेटर रोहित कट्टीमणी, नर्स सौ. , उपप्राचार्य डॉ.सुनील बनसोडे, कार्यालयीन अधिक्षक मा.संजीव मगदूम ,डॉ.रविंद्र डी.माने,प्रा.सौ.सुपर्णा संसुद्धी,डॉ. महादेव सूर्यवंशी,प्रा.संतोष डफलापूरकर,डॉ.खंडेराव खळदकर प्रा.मेहबूब मुजावर , राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.प्रभाकर माने यांनी केले. सदर लसीकरण मोहीमेबाबत महाविद्यालयातील पात्र विद्यार्थी - विद्यार्थिनी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा