Breaking

बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१

शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक अवकाशात ज्ञान व गुणवत्तेच्या जोरावर दैदिप्यमान कामगिरी करणारा अर्थशास्त्रीय तारा म्हणजेच प्रा.डॉ.अनिलकुमार वावरे


प्रो. डॉ.अनिलकुमार कृष्णराव वावरे

     प्रा.डॉ.अनिलकुमार कृष्णराव वावरे हे शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रात एक परिचयाचं नाव आहे. मात्र सद्या शिवाजी विद्यापीठाच्या बॅरिस्टर पी जी पाटील या आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर पुनश्च एकदा हे बहुआयामी व्यक्तिमत्व अर्थशास्त्र विभागाच्या एकूणच विद्यापीठ पातळीवर एक वैशिष्ट्यपूर्ण  अंगाने सर्वांच्या मनावर ठसले गेलं. डॉ.वावरे यांनी केलेला शैक्षणिक गुणवत्तेचा प्रवास हा पुढील पिढीला निश्चितच लाभदायक ठरणार आहे. परंतु सरांची सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमी पाहता तो एक संघर्षमय प्रवास ठरला आहे.

विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेले 

      सांगली जिल्ह्यातील भिलवडी या छोट्याशा गावातून सुरू झालेला त्याचा प्रवास हा आज शैक्षणिक गुणवत्तेच्या शिखरावरती कधी पोहोचला हे कळलच नाही .शिक्षकाच्या पोटी घेतलेला जन्म खरोखरच डॉ.अनिलकुमार यांनी सार्थक करून दाखविला. माता-पि त्या कडून मिळालेली  ज्ञानशिदोरी व संस्काराच्या जोरावर त्यांनी आपलं कर्तुत्व सिद्ध करून दाखविले. भिलवडी गावातून सुरू झालेल्या शैक्षणिक प्रवासात दुर्देवाने  दहावीच्या बोर्ड परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले मात्र आईवडिलांनी दिलेला विश्वास, प्रेरणा व  स्वतःची जिद्द,चिकाटी व महत्वकांक्षा याच्या आधारावर अपयशाने खचून न जाता त्यांनी बोर्ड परीक्षेत सुयश मिळवयशानेले. त्यानंतर मात्र शैक्षणिक प्रवास  बहरत गेला. आणि विद्यापीठाच्या एम. ए. अर्थशास्त्र विषयातून सामाजिक शास्त्रे या विद्या शाखेमध्ये सुवर्णपदक संपादन करून त्यांनी आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची चमक दाखवली. विशेष म्हणजे त्यांनी हा शैक्षणिक गुणवत्तेचा टप्पा आपल्या मामाच्या कडे इचलकरंजीला वास्तव्य करून दररोज विद्यापीठाकडे एसटीचा प्रवास करून पूर्ण केला.

   त्यानंतर जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथे सन -२००० साली अध्यापनाच्या क्षेत्रात तासिका तत्वापासून आपल्या सेवाभावी अध्यापन कार्याला सुरुवात केली. त्यावेळी जयसिंगपूर कॉलेजचे आम्ही सर्व विद्यार्थी त्यांचं ज्ञान व अध्यापन कौशल्य पाहून भारावून गेलो होतो. त्याचा परिणाम म्हणून कॉलेजच्या अर्थशास्त्र विभागाचा सुवर्णकाळ सुरू झाला. त्यापैकी मी स्वतः सरांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभावित झालो होतो.आज शेकडो प्राध्यापक डॉ.वावरे यांच्या वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाखाली कर्तुत्ववान प्राध्यापक म्हणून अध्यापनाची सेवा बजावत आहेत.

        डॉ.अनिलकुमार वावरे यांचा अर्थशास्त्र विषयातील शैक्षणिक गुणवत्तेचा प्रवास हा मूलतः सर्वांचे मार्गदर्शक व ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ प्रा. डॉ.ज.फा.पाटील,प्रा.डॉ. वसंतराव जुगळे या दोघांच्या१९९९ गुणवत्तापूर्ण  प्रेरणादायी  प्रभावाने  व उत्तम मार्गदर्शनाखाली सुरु झाला तो आजतागायत सुरू आहे. डॉ.वावरे हे १९९९ साली SET परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या  डॉ. एन.डी.पाटील महाविद्यालय, मलकापूर या महाविद्यालयात पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून रुजू झाले. आणि खऱ्या अर्थाने त्याच्या अध्यापन व संशोधनात्मक, संस्थात्मक व सामाजिक कार्याला प्रारंभ झाला.

      डॉ.अनिलकुमार  वावरे यांनी संपादन केलेली शैक्षणिक अर्हता M.A., Ph. D, G.D.C & A, (SET) असून अध्यापन अनुभव २२ वर्षे आहे. त्यानंतर महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी पुणे या ठिकाणी अध्यापनाचं उत्कृष्ट कार्य केले. आजतागायत छ. शिवाजी कॉलेज, सातारा येथे अध्यापन व संशोधनाचे कार्य अविरतपणे चालू आहे. डॉ. वावरे यांची संशोधनात्मक व्याप्ती पाहतसंशोधन जर्नल्स मध्ये ३८ पेपर,संशोधन प्रकल्प २,संशोधन मार्गदर्शक म्हणून  Ph.D.साठी ११ व M.Phil. साठी ५ संशोधक विद्यार्थी या माध्यमातून यांचा कार्य गौरवास्पद आहे. डॉ. वावरे यांची लेखणी सातत्याने अर्थशास्त्रीय लिखाणासाठी तळपत असते या माध्यमातून त्यांनी १० क्रमिक पुस्तके,८ संशोधन पुस्तके, ५० पेक्षा जास्त पुस्तकातील घटक लेखनाचं कार्य त्यांच्या हातून घडलेले आहे.

       डॉ.अनिल वावरे हे सातत्याने चळवळीशी संबंधित असल्याने व चळवळीचा चाड असल्यामुळे चळवळीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभागी होणे,चळवळीसाठी आर्थिक मदत करणे, गरजू व गरीब मात्र हुशार विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे शैक्षणिक  व आर्थिक मदत करणे त्याच्या संवेदनशीलतेचे वैशिष्ट्य आहें. एकूणच त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आवाका पाहता असंख्य पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत. आज पर्यंत १३ पुरस्कार प्राप्त झाले असून यामध्ये खालील पुरस्कारांचा समावेश आहे.

      दिवंगत प्रा.बी.के.पाटील पारितोषिक, स्वर्गीय बाळासाहेब देसाई स्मृती पुरस्कार, मराठी अर्थशास्त्र परिषदे


चे पारितोषिक,  शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषद कोल्हापूर तर्फे व्ही.एम. दांडेकर उत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार, जी. प्रा. पिपरकर परितोषिक , मराठी अर्थशास्त्र परिषदेत सर्वोत्कृष्ट संशोधन पेपरसाठी सुवर्णपदक, आदर्श शिक्षक पुरस्कार शिवाजी कॉलेज सातारा, डॉ.धनंजयराव गाडगीळ उत्कृष्ट शोधनिबंध परितोषिक, व्ही. एम. दांडेकर उत्कृष्ट संशोधन पेपर सुयेक, कोल्हापूर, कुसुमताई राजारामबापू पाटील उत्कृष्ट संदर्भ ग्रंथ पुरस्कार,  (सुयेक) संपतराव माने महाविद्यालय खानापूर, छ. शिवाजी कॉलेज साताराकडून प्राचार्य डॉ.ए.व्ही.मॅथ्यू बेस्ट परफॉर्मर अवॉर्ड,२०२१ व प्रि. डॉ. एस.आर. सूर्यवंशी बेस्ट रिसर्चर अवॉर्ड,२०२१ 

    उपरोक्त अशा असंख्य पुरस्काराने ते सन्मानित झाले आहेत. वयाच्या ४५ व्या वर्षी इतक्या पुरस्काराने सन्मानित होणे ही अशक्यप्राय गोष्ट त्यांनी  स्वकर्तुत्वावर सिद्ध करून दाखवली असून हे त्यांच्या अखंडितपणे केलेल्या कार्याची पोहोच पावती आहे.

     व्यावसायिक व विषयासंबंधी संघटनेतील त्यांचे योगदान अफाट असून त्यांनी आपल्या कौशल्याच्या आधारावर त्यांमधील ही आपली हातोटी कर्तुत्वाने सिद्ध करून दाखविले. सातत्याने अर्थशास्त्र विषयाच्या ध्यास,चौफेर विकास, प्रगती व गुणवत्तेसाठी अहोरात्र प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याच्या ध्येय प्राप्तीपोटी त्यांची धडपड ही वाखाणण्याजोगी आहे. उत्तम संघटनात्मक कौशल्य, सहकार्‍यांशी असलेला सुसंवाद, वरिष्ठांचा सन्मान करीत विषय व सुयेक संघटनेच्या गुणवत्तेची गरिमा राखणे हे कार्य त्याच्याकडून आपसूकच घडून गेले. त्यांनी आपल्या या शैक्षणिक प्रवासात उत्तम हातोटीच्या माध्यमातून संघटनात्मक काम करीत संघटना सक्षम व पर्यायाने गुणवत्तापूर्ण करण्याचा प्रयत्न केला.डॉ. अनिलकुमार वावरे हे सद्या शिवाजी युनिव्हर्सिटी इकॉनोमिक असोसिएशन,कोल्हापूर अर्थात सुयेकचे विद्यमान अध्यक्ष म्हणून कार्य करीत आहे. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर सदस्य-विद्या परिषद, शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाचे कार्यतत्पर चेअरमन म्हणून विराजमान आहेत, समकक्षता समितीचे सदस्य, विभागीय संशोधन समितीचे सदस्य,अभ्यासक्रम पुनरावृत्ती समिती अर्थशास्त्रातील अभ्यास अभ्यास मंडळाचे सदस्य,BoS चेअरमन-छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा, BoS Member - महावीर महाविद्यालय,कोल्हापूर,KBP कॉलेज, पंढरपूर,मालपाणी कॉलेज,संगमनेर, वालचंद कॉलेज सोलापूर व SGM कॉलेज, कराड या विविध महाविद्यालयांच्या अभ्यास मंडळाचे ते कार्यशील व विद्यमान सदस्य आहेत.

      छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा (Autonomous) विद्या परिषद, CSCS डीन- संशोधन, CSCS,IQAC, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.

       विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्याच्यासाठी सातत्याने झटणे हा त्यांच्या दिनचर्येचा अविभाज्य भाग बनलेला आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जबाबदारीने धुरा सांभाळीत आहेत.

      कोरोना महामारीच्या काळात सातारा जिल्ह्यातील अंध व निराधार व्यक्तींना प्रत्यक्ष सहभागी होऊन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आर्थिक मदत तसेच अंधांच्या नॅप या संस्थेला आर्थिक मदत करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.

        सरतेशेवटी, शैक्षणिक वर्तुळात विद्यार्थीप्रिय,अजातशत्रू म्हणून व सर्व घटकांना हवाहवासा वाटणारे हे व्यक्तिमत्व आहे. डॉ.अनिलकुमार वावरे नामक रूपातील एक सुप्रसिद्ध अर्थशास्त्रीय तारा हा शैक्षणिक अवकाशात उदयास आला आहे असेच म्हणावे लागेल. अर्थात तो सातत्याने तेजोमय ज्ञानरूपी प्रकाशाने अंधारमय अज्ञान दूर करून जगाच्या पटलावर अर्थशास्त्र विषयाचा एक लुकलुकणारा ज्ञानरूपी तारा नव्याने निर्मितीस आला आहे. खऱ्या अर्थाने या तार्‍याकडे आपणास देशाचे उज्ज्वल भविष्य, शैक्षणिक व सामाजिक परिस्थिती जबाबदारीने व कुशलतेने हाताळणारा किंबहुना अर्थशास्त्र विषयाच्या उचित प्रगतीसाठी खऱ्या अर्थाने यशस्वीपणे व विश्वासाने जबाबदारी स्वीकारणारा एक बहुश्रुत व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पहावे लागेल. एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे अर्थशास्त्र विषयाला योग्य पद्धतीने सांभाळणारा व तारणारे नेतृत्व या माध्यमातून पुढे येत आहे . त्यांच्या या वाटचालीमध्ये सौभाग्यवती सविता वावरे यांनी त्यांना अत्यंत मोलाची साथ दिलेली आहे. त्यांची प्रेरणा व प्रोत्साहन यामुळे ही वाटचाल अखंडपणे पुढेही चालूच राहील.

       वावरे सरांचा व्यासंग व लिखाण हे अर्थशास्त्राच्या उज्वल भविष्यासाठी खरोखरच लाभदायक ठरणार आहे. डॉ. अनिलकुमार वावरे म्हणजे ज्ञानाचा अखंडितपणे वाहणारा झरा तसेच प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या वैचारिक पणतीला अहोरात्र पणे तेवत ठेवणारा ही ज्ञान व प्रकाशरुपी वात आहे. त्यांच्या ज्ञानाची  सुरू असलेली अर्थशास्त्रीय शैक्षणिक दिंडी अशीच मार्गस्थ होत असताना सक्षम व उच्च कोटीची बनावी ती एवढीच अपेक्षा आहे.डॉ. वावरे यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी  खूप खूप शुभेच्छा।  


 संपादक व लेखक प्रा.डॉ. प्रभाकर तानाजी माने

प्रमुख, अर्थशास्त्र विभाग 

जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूर

ता. शिरोळ जि. कोल्हापूर

(  जय हिंद न्यूज नेटवर्क जयसिंगपूर )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा