Breaking

बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१

व्हिडिओ कॉल'पर सेक्स करोगे ? नागरिकांनो सावधान हे हनी ट्रॅप आहे, बळी न पडण्याचे जयसिंगपूर पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांचे आवाहन

 

संग्रहित छायाचित्र

✍🏼 मालोजीराव माने - कार्यकारी संपादक

     लॉकडाऊन् मधे जसे ऑनलाईन व्यवहार वाढले आहेत त्याबरोबरच ऑनलाईन फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. ज्यामध्ये सध्या बँकिंग फसवणुकीबरोबरच हनी ट्रॅप देखील जोरात फोफावत आहे. ज्यामध्ये राज्यातील बरेच तरुण तरुणी बळी बनत आहेत.


काय आहे हनी ट्रॅप ? 

     सोशल मीडियाच्या माध्यमातून जसे की व्हॉट्सअँप, फेसबुक मेसेंजर व इतर काही ऑनलाईन चॅटिंग अॅप मधून तरुण - तरुणींना अश्‍लील प्रलोभन दाखवून जवळीक साधली जाते. मग या चॅटिंगचे रूपांतर अश्लील व्हिडिओ पर्यंत पोहोचते. मग त्यांनी केलेल्या अश्लील कृत्याचे फोटो - व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते समाजात पसरवण्याची धमकी देत त्यांना ब्लॅकमेल केले जाते. व त्याबदल्यात भरमसाठ पैशांची मागणी केली जाते. 


अशा प्रकारचे मेसेज केले जातात.



वरील मेसेज या फेसबुक अकाऊंट वरून आले आहेत. तरी या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट आली तर ती स्वीकारू नये.


वरील फेसबुक अकाउंट किंवा अन्य कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी आपले  काही मित्र म्युचुअल फ्रेंड असले तरीही त्या व्यक्तीची पूर्ण खातरजमा केल्याशिवाय फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू करू नये.
     " वरील फेसबुक अकाउंट वरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. ती रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर लगेचच त्याचा मेसेज येतो [ ती व्यक्ती महिला असल्याचे सांगते व हिंदी मधे बोलते ] व काही जुजबी बोलणं झालं की व्हॉट्सअपवर बोलण्यासाठी विनंती करते व तुम्हाला तिच्या नंबरवर मेसेज करण्यास सांगते.  व्हॉट्सॲप वर मेसेज करताच वरील फोटो मध्ये दिल्याप्रमाणे ' व्हिडिओ कॉल पर सेक्स करोगे क्या ? ई.' चॅटिंग केलं जातं." व त्यांचा खेळ सुरू होतो.


    जिल्ह्यातील अनेक तरुण यात फसत आहेत, मात्र समाजात बदनामी होईल, या भीतीने असे प्रकार उघडकीस येताना दिसत नाहीत. त्यामुळे तरुण मानसिक व शारीरिक छळ झाल्याने आत्महत्येसारख्या टोकाचे पाऊल उचलत आहेत.


     फसवणूक टाळण्यासाठी फेसबुक, व्हॉट्सॲप किंवा इतर सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी जवळीक साधू नये. फेसबुक वापरताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये. तरीही अशाप्रकारे आपली फसवणूक झाली असेल तर तत्काळ पोलिसांत फिर्याद दाखल करावी, तक्रारदाराचे नाव गुपित ठेवले जाईल. असे आवाहन पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, जयसिंगपूर यांनी केलं आहे.

      जर कोणासोबत असा प्रकार घडला असेल तर त्यांनी तात्काळ पोलिसांना तक्रार करावी. तक्रारदाराचे नाव गुपित ठेवले जाईल. पोलिस स्टेशनला येण्यासही कोणी कचरत असेल तर त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी आम्ही स्वतः साध्या ड्रेसकोडमध्ये तुम्हाला योग्य वाटणाऱ्या ठिकाणी येवू. पण घाबरून कोणतेही चुकीचे व टोकाचे पाऊल उचलू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत.

             - राजेंद्र मस्के   पोलिस निरीक्षक, जयसिंगपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा