Breaking

मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१

स्वाभिमानी युवा आघाडीकडून कुरुंदवाड पोलीस ठाणेला दिले निवेदन : कंगना हिचा पद्म पुरस्कार काढून देशद्रोहाचा गुन्हा करावा दाखल

 

स्वाभिमानी युवा आघाडीकडून कंगना विरुद्ध निवेदन देताना


नेहा राठोड : विशेष प्रतिनिधी


कुरुंदवाड  : स्वाभिमानी युवा आघाडीकडून कुरुंदवाड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक भांगे यांना निवेदन देऊन भारत सरकारकडून अभिनेत्री कंगना राणावत हिला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घेऊन तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

       अभिनेत्री कंगना राणावत हिला भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले यावर प्रतिक्रिया देताना कंगना राणावतने भारत देश 1947 ला स्वतंत्र झाला नाही तर 2014ला स्वतंत्र झाला असे  वादग्रस्त वक्तव्य करून या देशाच्या दीडशे वर्षे इंग्रजांच्या गुलामगिरीतून सुटका करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिले आहे त्यांचा हा अपमानच आहे. तसेच देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात  शहीद झालेल्या वीरांचा असा अपमान करणे म्हणजे प्रत्येक भारतीयांच्या भावना दुखावण्याचा प्रकार आहे. 

कंगना राणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तिला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घेण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडी मार्फत देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी व महामहीम राष्ट्रपती यांना निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा