नाविद पटेल यांचा सत्कार करताना सर्व मान्यवर |
*प्रा.चिदानंद अळोळी ; नृसिंहवाडी प्रतिनिधी*
कुरुंदवाड : शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कुरुंदवाड पतसंस्थेच्या नूतन चेअरमन पदी मा.नावीद पटेल यांची तर व्हाॅईसचेअरमन पदी *सौ.सविता जाधव मॅडम* यांची निवड झाली आहे.
प्रारंभी उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष रईस पटेल यांनी केले .औरवाड तालुका शिरोळ येथे शिक्षक भारती ऊर्दू संघटनांचे राज्याध्यक्ष नाविद पटेल यांची शिरोळ तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झालेबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद शाळा या सर्वसामान्यांच्या व आर्थिक मागास वर्गातील मुलांना आधारस्तंभ आहे. इंग्रजी शाळेच्या लाटेत या शाळेतील पटसंख्या टिकून ठेवणे काळाची गरज आहे या शाळा सुद्धा इतराबरोबरच स्पर्धेत टिकून आहेत याचा आम्हाला अभिमान आहे असे प्रतिपादन शिक्षक भारती संघटनेचे राज्याध्यक्ष मुस्ताक पटेल यांनी केले .
या कार्यक्रमास मा.उपसरपंच दादेपाशा पटेल, अफसर पटेल ,लतिफ पटेल, तनवीर बहादूर, जमील पटेल, नियाज पटेल ,गुलाब शिकलगार, वसीम पटेल, इरफान पटेल, अमन मुल्ला ,आफताब पटेल, सर्फराज पटेल -शिक्षक भारतीय उर्दू संघटनेचे शिक्षक वृंद हजर होते. या कार्यक्रमाचे आभार आखलाख पटेल यांनी मानले.
नावेद पटेल व सविता जाधव यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा