वर्धमानसागर मुनी संघ |
आदिनाथ पाटील : अकिवाट प्रतिनिधी
अकिवाट : नोव्हेंबर 2022 मध्ये राजस्थान येथील महावीरजी येथे होणाऱ्या भव्य म्हामस्तकाभिषेक सोहळ्यासाठी श्री 108 वर्धमानसागर मुनी संघाने यात्रा चालू केली आहे. कर्नाटकातील कोथळी येथून चालू झालेली ही धर्मयात्रा 17 रोजी अकिवाट येथे अवतरली. आचार्य श्री 108 वर्धमानसागर महाराजांचं महात्म्य सर्वश्रुत आहे आणि याचीच प्रचिती बुधवारी अकिवाट येथे आली. सकाळी साधारण साडे सात वाजता मुनी वर्धमानसागरांच सैनिक टाकळीहून 33 मुनींसमवेत अकिवाट येथे आगमन झालं. कागे वेस येथे गावकऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. अविनाश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशासह आगमनास भव्य रूप आणला. प्रसंगी प.पू. क्षुल्लक 105 जिनसेनजी महाराज उपस्थित होते. ढोल-ताशासह गावात फेरी मारून मुनी संघाने श्री 1008 आदिनाथ तीर्थंकर जिंनमंदिराचे दर्शन घेतले. मुनींनी सोनाबाई गिऱ्याप्पा नाईक यांना सल्लेखना देवून पुण्यदान केले.
तत्पश्चात संघाने विद्यासागर अतिशय क्षेत्रास पलायन केले. विद्यासागर हायस्कूल येथे संघाचे आहारदान पार पडले आणि दुपारी विद्यासागर अतिशय क्षेत्रात भव्य पंचामृत अभिषेक सोहळा पार झाला. या सोहळ्यास प्रचंड प्रमाणात श्रावक श्राविका उपस्थित होते. मुनी संघाच्या उपस्थितीने वातावरण भक्तीमय बनले होते. त्यानंतर मुनी संघाने जुगुळसाठी प्रस्थान केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा