Breaking

गुरुवार, ४ नोव्हेंबर, २०२१

*पतसंस्था सेवक संघटनेच्या वतीने सहाय्यक निबंधक प्रेमदास राठोड यांचा सत्कार अन् सत्कारमुर्तीनी दिला सुखद धक्का....*

 

प्रेमदास राठोड यांचा विशेष सत्कार


*रमेशकुमार मिठारे : विशेष प्रतिनिधी*


     शिरोळ तालुक्याचे सहकार खात्याचे सहाय्यक निबंधक प्रेमदास राठोड यांना नवराष्ट्र वृत्तपत्र संस्थेने नुकताच को-ऑपरेटिव्ह अवार्ड २०२१   *"आदर्श सहाय्यक निबंधक अधिकारी"* हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आला.पुरस्काराचे औचित्य साधून शिरोळ तालुका पतसंस्था सेवक संघटनेच्या वतीने सहाय्यक निबंधक प्रेमदास राठोड यांचा शाल,बुके व पेढे देऊन ए.आर.ऑफिस शिरोळ येथे सत्कार करण्यात आला.

     या सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले की,अधिकारी वर्गाकडे बघण्याचा जनतेचा दृष्टीकोन हा नकारात्मक असतो .मात्र शिरोळ तालुक्यातील जनतेचा हा दृष्टिकोन बदललेला आहे.कारण महापुरावेळी झालेले पंचनामे असोत अथवा शेतकऱ्यांची कर्जमाफी असो अशावेळी माझे जनतेशी नाळ जुळले व त्यातुन मलासुद्धा चांगले काम करण्याची संधी मिळाली.या कामाची दखल घेत मला नवराष्ट्र वृत्तपत्र संस्थेने हा पुरस्कार देवून गौरविल्याचे सांगितले.

       राठोड साहेब यांनी सत्कार स्वीकारल्यानंतर  पतसंस्था सेवक संघटनेचे प्रत्येक पदाधिकारी यांना दिवाळी भेटवस्तू देऊन सर्वांना सुखद धक्का देत आपले सामाजिक बांधिलकी जपत एक वेगळाच आदर्श समाजापुढे ठेऊन सहकाराशी असलेली नाळ अधिकच घट्ट केली.....

    या सत्कार प्रसंगी शिरोळ तालुका पतसंस्था सेवक संघटनेचे अध्यक्ष- रमेशकुमार मिठारे, उपाध्यक्ष-संजय कुंभोजे, खजिनदार-संजय पाटील, संचालक- बाबासाहेब पाटील, शशिकांत कोडणिकर,शशिकांत कांबळे, राजेंद्र खोकाटे, राहूल पाटील, संचालिका- मोरे मॅडम,लाड मॅडम,परिट मॅडम , सदस्य - आदगोंडा पाटील, राजेश बुबणे, आण्णासाहेब मगदुम, परमानंद उदगांवे राहुल पाटील  व कार्यालयातील सहकारी अधिकारी वर्ग उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा