Breaking

बुधवार, ३ नोव्हेंबर, २०२१

*जयसिंगपूर मधील शाहूनगरमध्ये अपघात ; नागरिकांचे नगरपरिषद प्रशासना विरोधी रोष*


मध्यभागी असलेल्या विजेच्या खांबाला गाडीची धडक


मालोजीराव माने : कार्यकारी संपादक

   

     काल संध्याकाळी शाहूनगर मध्ये पुन्हा एकदा दुर्देवी अपघात घडला यामध्ये टेम्पोने रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या लोखंडी विजेचा खांबाला थेट धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की विजेचा खांब वाकला असून सदर खांबावरील तारा खाली लोंबकळत होत्या त्या घटनेनंतर ऐन दिवाळीतच या भागातील लाईट गेल्याने येथील लागली खूप संतापलेले होते. या घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नसून मात्र गाडीचे खूप मोठे नुकसान झाले आहे. अशा घटनेने संबंधित मालकाचे व नागरिकांचे नुकसान होत असून याला नेमके जबाबदार कोण हा प्रश्न अनुत्तरितच राहत आहे. कारण  जयसिंगपूर नगरपरिषद इलेक्ट्रिक विभागाकडून स्ट्रीट लाईट काढण्याच्या दिरंगाईमुळे आजची ही परिस्थिती ओढावली आहे अशा प्रकारची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

     जय हिंद न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना संबंधित नागरिक म्हणाले, गेल्या १ महिन्यापासून सतत संपर्क करून आज तागायत काम पूर्ण झाले नाही. आजच्या घटनेला जयसिंगपूर नगरपरिषदेचा इलेक्ट्रिक विभाग सर्वस्वी जबाबदार असून या घटनेबाबत विभागातील मुख्य कर्मचारी जबाबदार असल्याचे व त्याचे नाव सातत्याने घेतले जात होते.

        जयसिंगपूरातील शाहूनगर हा भाग सर्वात मोठा असून या ठिकाणी मुख्य रस्त्याच्या मध्यभागी विजेचे खांब आहेत. जयसिंगपूर शहराची किंबहुना शाहूनगरची वाढती लोकसंख्या पाहता या रस्त्यावर प्रचंड वर्दळ असून या मुख्य रस्त्याच्या मध्यभागी असणारे खांब हे अपघातास निमंत्रण देत असतात. गेल्या काही वर्षापासून शाहूनगरकर,सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक पुढाऱ्यांनी जयसिंगपूर नगरपरिषदेस मध्यभागी असणारे खांब काढून टाकण्या संदर्भात विविध तक्रार अर्ज दिले होते. तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या पोलवर रेडियम लावून अपघात टाळण्यासाठी प्रयत्न केला होता. याविषयी विविध  प्रसारमाध्यमांनी सदर बातमी उचलून धरली मात्र काही काळासाठी नगरपरिषदेस जाग आली. तसेच नगरपरिषदेने काम करण्याचं आश्वासन दिले होते त्यानंतर तेथील विजेचे खांब काढण्याचे काम सुरू झालं. मात्र या कामाला पुन्हा अडथळे आले. आज तागायत या रस्त्यावरील खांब न हटवल्यामुळे अनेक दुर्देवी अपघात घडले असून विशेष करून शाहूनगरकर त्रस्त झाले आहेत.

    खरं म्हणजे आगामी निवडणुकीची पार्श्वभूमी व येथील नागरिकांची मागणी पाहता नगरपरिषद प्रशासनाने यामध्ये जातीने लक्ष घालून सदर काम पूर्ण करावे अशी मागणी समस्त शाहूनगरकरांची आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा