Breaking

गुरुवार, ४ नोव्हेंबर, २०२१

शिरोळ : तालुक्यातील तीन ठिकाणाहून भेसळयुक्त खवा व इतर अन्नपदार्थ जप्त, अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

 शिरोळ : दिवाळीच्या पार्श्वूमीवर शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी, अकिवाट आणि ताकवडे येथे अन्न आणि औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी छापे टाकून १८ लाखाहून अधिक रकमेचा भेसळयुक्त खवा व मिल्क पावडर जप्त केली आहे.




संग्रहित छायाचित्र




अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 

अकिवाट येथील अमवा मिल्क अँड अग्रो प्रॉडक्ट येथे जवळपास १ लाख रुपयाचा भेसळयुक्त खवा तसेच अंदाजे साडे तीन लाख रुपयाचा मिल्क पावडरचा साठा जप्त करण्यात आला आहे.


ताकवडे येथील शिवरत्न मिल्क अँड अग्रो प्रॉडक्ट येथे स्किम्ड मिल्क पावडर व व्हे पावडरचा वापर करून खवा उत्पादन व विक्री केली जात होती. येथे धाड टाकून जवळपास ११ लाखांचा साठा जप्त केला आहे.


मजरेवाडी येथेही गणेश मिल्क प्रॉडक्ट येथून भेसळयुक्त खवा, बिना लेबलची पांढरी पावडर जप्त केली. बालाजी मिल्क प्रॉडक्ट येथूनही जवळपास २ टन व्हे पावडर जप्त करण्यात आली आहे.





Photo source - ABP maza


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा