Breaking

शुक्रवार, ५ नोव्हेंबर, २०२१

*औरवाड नागरी सहकारी पतसंस्थेकडून सभासदांना दिवाळी भेट*


औरवाड सहकारी पतसंस्थेकडून सभासदांना भेटवस्तू


*प्रा.चिदानंद अळोळी ; नृसिंहवाडी प्रतिनिधी*


  औरवाड नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे वेळेवेळी सभासदांना विविध कार्यातून मदत करत असते. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर  सुमारे ४०० सभासदांना दिवाळी भेट देण्यात आली.

      या भेटवस्तू वाटपाच्या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी कुरुंदवाडचे पोलिस उपनिरीक्षक बालाजी भांगे हे होते .त्याचसोबत  जकेरिया पटेल , उपसरपंच नितीन शेट्टी , जयवंत मंगसुळे , शकील पटेल , अफसर पटेल , दादेपाशा पटेल यांच्या हस्ते सभासदांना दिवाळी भेट स्वरूपात स्टील भांड्याचे प्रापंचिक साहित्याचे किट दिले . यावेळी चेअरमन आय. आय.पटेल यांनी मनोगत व्यक्त केले . मा.भांगे यांनी संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक केले .व्हा. चेअरमन अस्तमपाशा पटेल यांनी आभार मानले.

     संस्थेच्या सभासदाकडून या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा