Breaking

गुरुवार, ४ नोव्हेंबर, २०२१

लोटस मेडिकल फौंडेशन कोल्हापूर मध्ये सिनेअभनेते राहुल बोस यांच्या उपस्थितीत संस्थेतील मुलांसाठी विशेष दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन.

 




आज दि. ०४ नोव्हेंबर २०२१ रोजी लोटस मेडिकल फौंडेशन मधील मुलांसाठी प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते व पूर्व भारतीय रग्बी टीमचे कॅप्टन श्री. राहुल बोस यांच्या उपस्थितीत दिवाळीचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमात संस्थेतील मुलांसोबत राहुल बोस यांनी मुक्त संवाद साधला व त्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत हितगुज साधले. मुलांना संबोधन करत असताना ते म्हणाले की आपल्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी आपला स्वतः वर विश्वास असला पाहिजे. ज्यामुळे आपल्यामध्ये स्व- जाणीव निर्माण होऊन आत्मविश्वास वाढवण्यास मदत मिळते. तसेच आपण त्या अडचणींवर मात करण्यासाठी सक्षम बनतो. यासाठी त्यांनी मेरी कॉम आणि त्यांच्या स्वतः च्या आयुष्यातील काही घटनांचे उदाहरण देत त्या विषयाचे महत्त्व पटवून सांगितले. तसेच पुढे ते करिअर संदर्भात बोलताना म्हणाले की आपल्याला आपले करिअर निवडताना बरेच प्रश्न निर्माण होत असतात. तर अशावेळी आपण नवनवीन पर्याय शोधायला पाहिजे आणि आपण कोणत्या विषयात किंवा क्षेत्रात उत्तम कार्य करू शकतो हे शोधून आणि स्व- परीक्षण करून आपले निर्णय घ्यायला हवे. असे राहुल बोस म्हणाले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी मुलांना दिवाळीच्या शुभेच्छा देत त्यांच्यासोबत फोटो काढले. उपस्थित मुलांना अल्पोपहार व दिवाळीची छोटीशी भेट देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 




प्रस्तुत कार्यक्रमाप्रसंगी लोटस मेडिकल फौंडेशन च्या चेअरमन- सौ. उषा थोरात, व्यवस्थापकीय विश्वस्त- डॉ. किमया शहा, विश्वस्त- श्री. सुनील गुंडाळे आणि संस्थेतील इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा