मिरज टाकळीमध्ये दुर्दैवी अपघात |
प्रविणकुमार माने : उपसंपादक
मिरज : टाकळीच्या ओढ्यामध्ये दोन पारधी व एका बालिकेचा बुडून मृत्यू झाला आहे.यामध्ये ओढ्यामध्ये आंघोळीला गेल्यानंतर ही दुर्दैवी घटना घडलेली आहे.टाकळी बेडकरनगर जुना मालेगाव रस्ता मल्लेवाडी ओढ्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. दुपारच्या सुमारास कु.नंदिनी देवा काळे वय वर्ष १६ , मेघा चव्हाण काळे वय वर्ष १८ व स्वप्नाली टवळ्या पवार वय वर्ष ६ राहणार आंबेडकर नगर आणि पारधी वस्ती ह्या तिघी जणी आंघोळीला गेल्यावर त्या परत न आल्याने त्यांच्या घरच्यांना शोध सुरू केला. ओढ्याच्या काठावर तिघींची चप्पल व कपडे पाहून त्या तिघी जणी पाण्यात बुडाल्याची शंका आली.या घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते नागेश कोलप, अंकुष वाघमारे व विजय भोसले यांच्या मदतीने पाण्यात शोध सुरू केला. त्याच्या सुमारे पंधरा फूट खोल पाण्यात काटेरी झुडपांचा गळ तयार करून शोधकार्य सुरू करण्यात आलं. ओढ्यातून बाहेर काढलेले मृतदेह शवविच्छेदनाला पाठविण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंद्रे आणि त्यांच्या कर्मचाऱ्याने या घटनेची सखोल माहिती घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. मृतदेह पाहून त्या वेळी पारधी कुटुंबाने एकच आक्रोश सुरू केला होता.
या दुर्देवी घटनेची माहिती मिळताच सर्वत्र शोककळा पसरली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा