Breaking

शनिवार, ६ नोव्हेंबर, २०२१

जगातील महत्वाची शहरे पाण्याखाली जाणार ; ग्लोबल वार्मिंगचा प्रचंड मोठा धोका : क्लायमेट सेंट्रलचा अहवाल प्रसिद्ध

 

Source : Topper.com


     ग्लोबल वॉर्मिंगचे संकट अत्यंत गंभीर व भयानक होत चालले असून जगातील महत्वाची शहरे  सन २१०० पर्यंत जलमय होणार आहेत. जागतिक तापमानवाढीमुळे बर्फ वितळू लागल्याने हिमकडे कोसळून समुद्रातील पाण्याची (water) पातळी वाढू लागली आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवर वसलेल्या शहरांना मोठा धोका निर्माण झाला आहे. जगप्रसिद्ध क्लायमेट सेंट्रल नावाच्या प्रकल्पाअंतर्गत जागतिक तापमान वाढीसंदर्भात एक अहवाल प्रकाशित करण्यात आला आला आहे.

    जागतिक तापमानवाढीचा वेग आणि त्यामुळे समुद्राच्या पातळीत होणारी वाढ यांचा विचार करून अहवाल तयार करण्यात आला. समुद्राच्या पातळीत वाढ झाल्यास सर्वाधिक धोका कोणत्या शहरांना असेल याची यादी अहवालात आहे. त्यानुसार आगामी ९ वर्षांत जवळपास ९ मोठी शहरं पाण्याखाली  जाणार असून दुर्दैवाने या यादीत भारतामधील कोलकत्ता शहराचा समावेश आहे.

    पश्चिम बंगालची राजधानी असलेलं कोलकाता शहर २०३० पर्यंत पाण्याखाली जाऊ शकतं. मान्सूनचा पाऊस आणि भरती यामुळे कोलकात्यात अनेकदा पूर परिस्थिती निर्माण होते. संपूर्ण शहरात पाणी साचतं. पावसाच्या पाण्याचा निचरा लगेच होत नाही. त्यामुळे कोलकात्याला मोठा धोका आहे. याशिवाय समुद्राच्या पाण्याची (water) पातळी वाढत असल्यानं दुहेरी संकट आहे.


जगातील कोणत्या शहरांना तापमानवाढीचा गंभीर धोका?

१.न्यू ओरलींस, अमेरिका 


. कोलकाता, भारत


३. ऍमस्टरडॅम, नेदरलँड


४. सवाना, अमेरिका


५. जॉर्जटाऊन, गयाना


६. बसरा, इराक


७. बँकॉक, थायलंड


८. हो ची मिन्ह, व्हिएतनाम


९. वेनिस, इटली

      उपरोक्त  महत्त्वाची शहरांची बुडण्याची शक्यता मात्र अधिक असून ही वैश्विक गंभीर बाब आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा