Breaking

शनिवार, ६ नोव्हेंबर, २०२१

*जयसिंगपूरच्या बुद्ध विहारमध्ये वधू-वर परिचय मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न*

 

बुद्ध विहारात कार्यक्रम संपन्न


जीवन आवळे :  विशेष प्रतिनिधी


जयसिंगपूर : जयसिंगपूर येथील वैशाली बुद्ध विहार येथे सम्यक शिक्षण विचार मंच, कोल्हापूर महाराष्ट्र राज्य व शिरोळ समिती यांच्या बुद्ध विहार येथे वधू-वर परिचय मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा को.जी.मा.शि. चे तज्ञ संचालक मा.दादासाहेब लाड व मा.सर्जेराव गायकवाड मराठी चित्रपट निर्माते व अध्यक्ष मा. संघमित्रा भिमराव सर व सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

        कार्यक्रमाची सुरुवात स्वागत व प्रास्ताविक मा.रमाकांत बुद्धीसागर सर यांनी केले. तर मा. सुनिल चव्हाण सर व मा. धनंजय पाठक यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सर्व मान्यवरांच्या हस्ते शिरोळ तालुक्यातील मागासवर्गीय विदयार्थ्यांचा (१०वी १२ वी) प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

     सदरच्या कार्यक्रमात घोडावत कन्या कॉलेज जयसिंगपूर येथे प्रभारी प्राचार्य पदी प्रा.डॉ.धनंजय कर्णिक यांची निवड तसेच के.डब्ल्यू. सी. कॉलेजमध्ये उपप्राचार्यपदी नियुक्त झालेले प्रा.सुरेश भाटीया, नांदणी हायस्कूलचे मुख्याध्यापक मा.एम्.सी. जयकर, 'भारतीय बौद्ध सभा उपाध्यक्ष सेनापती भोसले, सामाजिक कार्यकर्ते मा. रमेश शिंदे, मा.लक्ष्मण सकटे व डॉ.शिलवर्धन चिपरीकर या मान्यवर घटकांचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला.

    यानंतर वधू-वर परिचय मेळावा हा उपक्रम एक सामाजिक उपक्रम पूर्ण महाराष्ट्रभर करण्याचा संकल्प सर्वांनी व्यक्त केला. शिरोळ तालुक्यातील प्रमुख सतीश चिपरीकर सर, दिपक कांबळे सर सचिन कांबळेसर,संदेश कांबळे सर, सुभाष धनवडे सर यांनी या कार्यक्रमासाठी कष्ट घेतले. सहभागी वधु-वरांना समिती प्रमुख मंगल कांबळे मॅडम व निकिता कांबळे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन मा. सतीश चिपरीकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यासह पालकांचाही सहभाग उत्स्फूर्त होता. 

   प्रारंभी सुनिल कांबळे सर व कराटे प्रशिक्षणार्थी यांनी कराटे प्रात्यक्षिक दाखवून वाहवा मिळविली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा