शिरोळ प्राथमिक शिक्षक समितीच्या विविध मागण्यांसाठी निदर्शने |
मालोजीराव माने : कार्यकारी संपादक
जयसिंगपूर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने खालील विविध मागण्यांसाठी शिरोळ तहसील कार्यालयावर जोरकस निदर्शने करण्यात आली. यामध्ये समितीच्यावतीने शिक्षक सेवकांचे मानधन सरसकट २५ हजार करावे, सातव्या वेतन आयोगातील वरिष्ठ वेतन श्रेणीच्या व पदवीधर शिक्षकांच्या वेतन त्रुटी दूर कराव्यात व १ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू कराव्यात, वस्ती शाळा शिक्षकांची सुरुवातीची नियुक्ती तारीख सर्व लाभांसाठी धरण्यात यावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांप्रश्नी न्याय मिळावा यासाठी सदर मागण्यांचे निवेदन तहसील कार्यालयास देण्यात आले.
सदर समितीच्या निवेदनात मागण्या अशा आहेत की,
१) डीसीपीएस शिक्षकांच्या पगारातून कपात झालेल्या रकमांच्या हिशेबातील घोळ दुरुस्त करावा.
२) सर्व शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी.
३) जून २०१४ ची अधिसूचना रद्द करून केंद्रप्रमुखांच्या सर्व रिक्त जागा शिक्षकांमधूनच भराव्यात यासह विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी प्राथमिक शिक्षक समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सुरेश पाटील, श्रीकांत कुरणे,रा.बा. कोळी,विनायक मगदूम,भगवान कोळी, विठ्ठल भाट, संभाजीराव जाधव, दीपक पाटील, संजय निकम, धोंडीराम बाबर यांच्यासह शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सदर समितीच्या मागण्या खूप वर्षापासूनच्या प्रलंबित असल्याने समितीचे सर्व घटक आक्रमक झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा