सर्व मानकरी, पुजारी व अन्य मान्यवर |
विशेष प्रतिनिधी : फिजा बागवान
शिरोळ : येथे श्री बुवाफन महाराज उत्सव सोहळ्यानंतर बुधवारी हजरत नूरखान बादशाह उरुसाला प्रारंभ झाला आहे, येथील बसस्थानक नजीक असणाऱ्या हजरत नूरखान बादशहा दर्ग्यात बुधवारी रात्रीपारंपारिक मानकरी, दर्गा पुजारी व भाविक यांच्या उपस्थितीत गंधरात्र सोहळा पार पडला, उरुसानिमित्त भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे,
येथे बुधवारी सायंकाळी सवाद्य मिरवणुकीने हजरत नूरखान बादशाह दर्ग्यात मानकरी, दर्गा पुजारी , भाविक यांच्या उपस्थितीत गलिफ घालण्याचा कार्यक्रम झाला, यावेळी चर्मकार समाजाचे नायकू माने, शिवाजी माने, शंकर माने , पत्रकार दगडू माने यांच्यासह दर्गा पुजारी बशीर शेख (देवर्षी) , नगराध्यक्ष अमरसिंह पाटील , अजिंक्य पाटील , श्रेयश माने, परवेज मिस्त्री, सुलतान शेख , दिलावर कुरणे , योगेश पाटील, विश्वजीत शिंदे, श्रेयश माने, विनायक माने, सुदर्शन माने आदी उपस्थित होते,
उत्सव व उरूस पार पाडण्यासाठी हिंदवी स्वराज्य मंडळाची उरूस समिती परिश्रम घेत आहेत , उरूस समिती अध्यक्ष संदीप कोळी, उपाध्यक्ष दिलीप कोळी, दिवान कोळी, विनायक तराळ ,शिवाप्पा कोळी ,वैभव धुमाळ, आकाश कोळी ,सुधीर चूडमुंगे ,अजिंक्य कदम ,ऋषिकेश पाटील ,आशिष सावंत, गौरव धुमाळ ,रमेश कोळी ,रामचंद्र सावंत यांच्यासह पृथ्वीराज यादव ,विजय आरगे, पिंटू फल्ले ,विठ्ठल धुमाळ, विश्वचंद माचरेकर ,सुरेश माने- चूडमुंगे,धनाजी पाटील -नरदेकर तसेच हिंदवी स्वराज्य मंडळाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा