प्राचार्य डॉ.मांजरे व विद्यार्थी TT ची इंजेक्शन घेताना |
*प्रा. डॉ. महावीर बुरसे : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूर मधील जुनिअर विभागातील 11 वी च्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी शालेय टी टी इंजेक्शन कॅम्पचे आयोजन जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्र यांचेमार्फत करण्यात आले होते. याप्रसंगी अकरावी मधील आर्टस, कॉमर्स व सायन्स विभागातील सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना TTE चे इंजेक्शन देण्यात आले.
जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख सुप्रसिद्ध धन्वंतरी डॉ. पांडुरंग खटावकर यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित राखण्याकरिता तसेच जयसिंगपूर केंद्राचा कर्तव्याचा एक भाग म्हणून कॉलेजमधील विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांना TT चे इंजेक्शन देण्यात आले. या कार्यक्रमासाठी कॉलेजच्या वतीने उत्तम नियोजन करण्यात आले.
डॉ. पांडुरंग खटावकर यांच्या उत्तम नेतृत्वाखाली तसेच श्री. सुनील आलासकर यांच्या पुढाकाराने नागरी विभाग जयसिंगपूरच्या ANM श्रीमती वर्षा खटावकर ,ANMश्रीमती वनिता काटकर व मदतनीस श्रीमती ज्योती कांबळे यांनी अनमोल असे सहकार्य केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.सुरत मांजरे, उपप्राचार्य डॉ. सुनील बनसोडे, डॉ.एन.एल.कदम तसेच ज्युनियर विभागाचे पर्यवेक्षक प्रा.भारत आलदर, एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने, डॉ.महावीर बुरसे, कार्यालयीन अधिक्षक श्री.संजय मगदूम तसेच विशेष सहकार्य श्री.सुनिल चौगुले,श्री.बाळगोंडा पाटील, श्री. शितल पाटील व सौ. अमृता पाटील यांचे लाभले. सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने याचा लाभ घेतला.
सदर कार्यक्रमाने प्राथमिक आरोग्य केंद्राचे विद्यार्थी व समाजप्रती असलेलं सामाजिक भान, आरोग्य सुविधा व सेवा लक्षात घेता कॉलेजच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करून त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल महाविद्यालयाकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचं आनंदाने कौतुक केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा