Breaking

गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१

शिरोळचे पत्रकार दगडू माने यांना 'आदर्श लोकसेवक' पुरस्कार प्रदान


मान्यवरांच्या हस्ते पत्रकार दगडू माने यांचा सन्मान होताना


मालोजीराव माने  :  कार्यकारी संपादक


शिरोळ : येथील दै पुण्यनगरीचे तालुका प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते दगडू  माने यांना शिरोळचा आवाज न्युज मीडिया नेटवर्कच्या वतीने 'आदर्श लोकसेवक'  पुरस्काराने गौरविण्यात आले,शिरोळ येथील हरी मंदिर येथे  हा समारंभ झाला.


          यावेळी ज्येष्ठ विचारवंत  प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे व समाजवादी प्रबोधनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी, राष्ट्रसेवा दलाचे बाबासाहेब नदाफ यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते श्री माने  यांना मानपत्र, सन्मानचिन्ह व पुस्तक भेट देऊन सन्मान करण्यात आला, 

      


पत्रकार दगडू माने यांनी विविध  सामाजिक संस्था पातळीवर काम करून  समाजाप्रती योगदान दिले आहे, सामान्य गोरगरीब ,निराधार ,दिव्यांग ,दुर्लक्षित व वंचित घटकांना न्याय मिळावा यासाठी त्यांचे कार्य आहे, शिवाय उत्कृष्ट पत्रकार व नाट्य -सिने कलाकार म्हणूनही ते परिचित आहेत.


               या कार्यक्रमास स्वागताध्यक्ष तथा नगराध्यक्ष अमरसिंह पाटील ,राष्ट्र सेवादलचे राष्ट्रीय संघटक  नदाफ, रामराव सुर्यवंशी यांच्यासह चिदानंद कांबळे मनोज रणदिवे अशोक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते, अविनाश सूर्यवंशी यांनी स्वागत केले, राजेंद्र प्रधान यांनी सूत्रसंचालन केले, सचेतन बनसोडे यांनी आभार मानले,

       या पुरस्काराने खरोखरच खऱ्या लोक सेवकाचा सन्मान झाला आहे अशा प्रकारची चर्चा जनमानसात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा