रूपालीताई चाकणकर,राज्य महिला आयोग अध्यक्षा |
पुणे- राज्यातील वाढते बालविवाहाचं (child marriage) प्रमाण रोखण्यासाठी राज्य महिला आयोग(State Women Commission) अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवून नवीन नियम लागू करण्याची मागणी केली आहे.
वाढते बालविवाह रोखण्यासाठी,आज राज्य महिला आयोगाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांना शिफारस पाठविण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने प्रथमच अशा स्वरूपात निर्णय घेतला असून, आपल्या सर्वांच्याच सहकार्याने हा निर्णय यशस्वी होईल याची खाञी वाटते. pic.twitter.com/bTYWElkP8D
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) November 12, 2021
या नियमानुसार महाराष्ट्रात ज्या ठिकाणी बालविवाह झाल्याचं निदर्शनास येईल तेथील स्थानिक लोकप्रतिनिधी जसं की सरपंच तत्सम प्रतिनिधी आणि विवाह नोंदणी अधिकारी जसं की, ग्रामसेवक, तलाठी किंवा तत्सम अधिकारी यांची जबाबदारी निश्चित कारावी. त्यानंतर अश्या प्रकारची घटना घडली व त्याची दोष सिद्धी झाल्यास त्यांचे पद रद्द करण्यात यावं. ही दुरुस्ती बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मध्ये करावी. बालविवाह झाल्याचे सिद्ध झाल्यास त्यांचं पद रद्द करण्यात यावे अशी शिफारस असलेले पत्र राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.
आता यावर मुख्यमंत्री व कायदेमंडळ काय भूमिका घेते यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा