Breaking

मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१

क्रांतिगुरू लहुजी साळवे यांची जंयती उत्साहात साजरी; त्यांचे कार्य व विचारांचा जागर होणे गरजेचे: माजी पोलिस उपअधीक्षक आर. आर.पाटील

 

लहुजी साळवे जयंती निमित्त सत्कार समारंभ

शशिकांत घाटगे  : विशेष प्रतिनिधी


कोल्हापूर : शिवाजी पेठेतील, शिवाजी तरुण मंडळा मध्ये क्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून निवृत्त पोलिस उपअधीक्षक आर आर पाटील यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.

      माजी पोलिस उपअधीक्षक आर. आर.पाटील याप्रसंगी म्हणाले,महात्मा फुले यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्यात  क्रांतिगुरू लहुजी साळवेंचा सिंहाचा वाटा होता. आज त्याच्या कार्याला व विचारांना उभारी देण्याची गरज आहे.

     यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना शौर्य पुरस्कार देऊन  गौरवण्यात आले. यामध्ये सिध्दांत हाॅस्पिटलचे  डॉ.कौस्तुभ वाईकर,शिरोलीचे पोलीस निरीक्षक राजेश खांडवे,एक्साईजचे पोलीस निरीक्षक संभाजी बर्गे,मुख्य औषध निर्माण अधिकारी  वैशाली जाधव,राष्ट्रीय खेळाडू प्राजक्ता सूर्यवंशी,संघर्षनायक बहुजन मिशनचे संस्थापक संतोष आठवले, दलितमित्र बळवंतराव माने,कामगार नेते नामदेव नागटिळे,आरोग्यसेवक अमोल इसापुरे,महाराष्ट्राचे हलगी सम्राट युवराज गायकवाड,जीवन आधार संस्थेचे संस्थापक शंकर पोवार आदींना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

      याप्रसंगी  गोकुळचे संचालक चेतन नरके,आंतरराष्ट्रीय स्त्रीरोगतज्ञ डॉ.सतीश पत्की,  शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुजितभाऊ    चव्हाण,अजितदादा चव्हाण,ज्येष्ठ विधिज्ञ  अॅड.दत्ताजीराव कवाळे,रिपाई चे  कायदेशीर सल्लागार  अॅड.राहुल  सडोलीकर,अॅड.सचिन आवळे,  अॅड.प्रमोद दाभाडे,परिवतर्तन फौंडेशनचे अमोल कुरणे,क्रांतिगुरू लहुजी (वस्ताद)साळवे प्रतिष्ठानचे संस्थापक अक्षय साळवे,ऋषिकेश दिवटे, बाळासाहेब साळवे आदी उपस्थित होते.

     सदरच्या कार्यक्रमाने नवपिढीमध्ये चेतना व नवविचारांना संजीवनी मिळण्याची शक्यता असल्याची प्रतिक्रिया उपस्थित कार्यकर्त्याने दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा