फटाकेमुक्त दिवाळी |
हिना मुल्ला : विशेष प्रतिनिधी
रुकडी : आज संपूर्ण देशात उद्योगधंद्यांचा विस्तार,वाढती वाहनांची संख्या, प्रचंड वेगाने वाढणारे नागरीकरण आणि आधुनिक शेती यामुळे हवा,पाणी आणि जमीन यांच्या प्रदुषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या विविध प्रकारच्या प्रदूषणामुळे सजीव सृष्टीला धोका पोहचला आहे.आपल्या वसुंधरेला प्रदूषणाच्या विळख्यातून सोडविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत असे मत प्राचार्य डाॕ.प्रशांतकुमार कांबळे यांनी व्यक्त्त केले. ते येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने "माझी वसुंधरा अभियान"अंतर्गत फटाके मुक्त्त दिपावली या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होते.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक कार्यक्रम अधिकारी डाॕ.गिरीश मोरे यांनी केले. या व्याख्यानात फटाके मुक्त्त दिपावली साजरी करण्याचे आवाहन डाॕ. प्रशांतकुमार कांबळे यांनी केले तसेच उपस्थित विद्यार्थी व शिक्षक यांनी फटाके मुक्त दिपावली साजरी करण्याची शपथ घेतली.
या कार्यक्रमास डाॕ. उत्तम पाटील, डाॕ. मुकुंद हळदकर, श्री.भाऊसाहेब वडार राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा