Breaking

मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१

*कॅबिनेट मंत्री सौ शशिकला जोल्ले यांनी बसव तत्वानुसार नवदाम्पत्यास विवाह प्रसंगी दिली वचनप्रतिज्ञा*

 

कॅबिनेट मंत्री शशिकांत जोल्ले यांनी दिली वचन प्रतिज्ञा



निपाणी प्रतिनिधी :-  रमेशकुमार मिठारे. 

 9822332446*


निपाणी : कर्नाटक राज्याच्या कॅबिनेट मंत्री सौ शशिकला जोल्ले यांची भाची कोमल व जागतीक लिंगायत महासभेचे  कार्यकर्ते राजशेखर तंबाके (कोल्हापूर) यांचे द्वितीय सुपुत्र ऋषिकेश या दाम्पत्याचा बसव धर्मसंस्कृती अनुसार (गुरू-लिंग-जंगम) साक्षीने कल्याण महोत्सव (विवाह सोहळा) मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या कल्याण महोत्सवाची सुरवात लिंगायत धर्माचा धर्मध्वज षटस्थलध्वजारोहण करून झाली. त्यानंतर धर्मगुरू महात्मा बसवण्णांच्या प्रतिमेस वधू वराकडून पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यानंतर समानतेचे द्योतक स्वरूप म्हणून वधूने वराला रुद्राक्ष-मांगल्य धागा बांधला नंतर वराने वधूला पारंपरिक मंगळसूत्र बांधले तसेच वधु-वरानी एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घातले. अखेरीस कॅबिनेट मंत्री सौ शशिकला जोल्ले यांनी बसवपिठावर वधू -वरांकडून "सहजीवनाची वचन प्रतिज्ञा" वदवून घेतली. 

       बसव तत्वानुसार या विवाहप्रसंगी अक्षतारोपणला फाटा देऊन

तांदुळाची नासाडी न करता वचन जयघोषामध्ये बसवपिठावरील उपस्थित शरण-शरणीनी पुष्पवृष्टी केली. नंतर इतर उपस्थितांनी पुष्पवृष्टी करत आशिर्वाद दिले. या नेटक्या सुनियोजित कल्याणमहोत्सवाच्या माध्यमातून उपस्थित समाजबांधवांमध्ये प्रबोधन घडून बसव धर्मसंस्कृती पुन्हा एकदा लिंगायत समाजात आचरणात आली असलेचे दिसुन आले.

    धारवाड येथील बसव केंद्राच्या शरणी सविता नाडकट्टी आणि त्याचे युवा सहकारी यांनी या सोहळ्यामध्ये क्रियामूर्ती म्हणून सर्व धार्मिक विधी केले. हा नयनरम्य कल्याण महोत्सव सोहळा निपाणी तालुक्यातील भिवशी येथील जोल्ले फार्म हाऊसवर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा