-
स्पर्धेतील विजेता संघ नवी मुंबईला पारितोषिक देताना मान्यवर |
*प्रा.चिदानंद अळोळी ; नृसिंहवाडी प्रतिनिधी*
औरवाड : येथील लिडर व्हाॅलीबाॅल क्लबच्या वतीने निमंत्रित संघाच्या राज्यस्तरीय व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात नवी मुंबई व मालेगाव या दोन संघात झालेल्या अंतिम सामन्यात नवी मुंबई ने दोन 15-10 , 15 - 7 अशा दोन सेटसमध्ये मालेगाव चा पराभव करीत एकतर्फी विजेतेपद पटकाविले.
या स्पर्धेत सहभागी संघात खूप मोठी चुरस दिसून आली.दोन दिवस सुरू असलेल्या या स्पर्धेत पावसाची सुद्धा उपस्थिती होती. अंतिम सामन्यात नवी मुंबई ने बाजी मारत प्रथम क्रमांक, मालेगाव द्वितीय क्रमांक , तृतीय क्रमांक सातारा, चतुर्थ क्रमांक जामणेर अदि संघांनी पटकाविले. दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, सरपंच अशरफ पटेल, उपसरपंच नितीन शेट्टी , गोपाळदादा रावण, मुश्ताक पटेल सर अदि होते.
स्पर्धेत राज्यातील 32 संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात नवी मुंबई व मालेगाव यांच्यात अतीतटीच्या रंगतदार सामना झाला. या मैदान प्रेक्षकांच्या गर्दीने भरले होते. तीन सेट च्या सामन्यात दोन सेटसमध्ये नवी मुंब ने एकतर्फी दोन 15-10, 15 - 7 अशा गुणांनी विजय मिळविला. या सामन्यात मालेगावचा अंजूम वकार मॅन ऑफ द मॅच तर नवी मुंबईच्या इस्तियाक अन्सारी मॅन ऑफ द सिरीज मिळाले. बेस्ट शूटर सोएब शेख - जामणेर , बेस्ट डीफेंसर मुब्बशीर अन्सारी - नवी मुंबई यांना मिळाले. पंच म्हणून रमेश पोवार, विजय गोंधळी, आलीशा फकीर यांनी काम पाहिले.
सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी मोहन जंगम, अजीम नाईक ( सर ) माजीद पटेल, शकील परीजादे, नबी पटेल, अजीज पटेल, राजू जंंगम, महावीर सूर्यवंशी अदि परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा