Breaking

मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१

श्री. अमोल गावडे सर यांना ए. जे. सोशल वेलफेअर फाउंडेशन या संस्थेच्या वतीने सन 2021 सालचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षकरत्न गौरव पुरस्कार

श्री.अमोल गावडे


       


 

 शिरोळ गावातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेले श्री अमोल गावडे सर हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्थर वाढावा या उदेशाने अतिशय प्रामाणिक प्रयत्न ते सतत करत असतात या मध्ये शिरोळ ,नृसिंहवाडी ,औरवाड या गावाचा समावेश आहे . आपण बघतो मानवी स्वभावं की मनुष्य शिक्षण घेतलं की तो स्वतःच स्वार्थ पाहत असतो पण गावडे सर, फक्त स्वार्थ न पाहता विद्यार्थी ,पालक ,शिक्षक यांचा सुवर्ण मध्य सांभाळून श्री राजू काळे सरांच्या सहकार्याने , हजारो विद्यार्थी आज घडवत आहेत .आपल्या ज्ञानाच्या कौशल्यावर त्यांनी आपले नाव विद्यार्थ्यांच्या मनात बनवले आहे ,अनेक संकट आली पण कधीही ते डगमगले नाहीत, सदैव विद्यार्थ्यांच्या सेवेत राहिले .त्याला नैसर्गिक आपत्ती सुद्धा अपवाद ,2019 चे महापूर असो वा सध्याचे कोरोना ,त्यांनी विद्यार्थी हित पुढे ठेवून ,शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण प्रणाली मार्फत सतत विद्यार्थ्यांचा प्रगती साठी प्रयत्न करत असतात ,तालुक्यातील कोणत्याही शैक्षणिक नवीन उपक्रम आपल्या मुलांना कसे भेटेल , त्यांना अपल्यालाल काय नविन देता येईल का? याचा सतत ते विचार व प्रयत्न करत असतात.


       तसेच शिरोळ गावात सर्व प्रथम त्याच्या वडिलांनी देहदान करून समाजाला आदर्श दिला व स्वतः अमोल गावडे हे सुद्धा देहदानाचा फॉर्म भरून रितीसर प्रक्रिया पूर्ण केली आहे . त्याच सोबत अनेक आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा व्यथा सोडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात म्हणूनच आज ते शिरोळ सह परिसरात विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत .म्हणूनच त्याच्या कार्याची दखल घेऊन प्रमुख पाहुणे पारनेर चे आमदार श्री निलेश लंके, चला हवा येऊ द्या चे कलाकार सागर कारंडे, शिवकन्या शिवानीताई देशमुख, प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले .




     या सत्कार समारंभ प्रसंगी पारनेर चे आमदार श्री निलेश लंके, चला हवा येऊ द्या चे कलाकार सागर कारंडे, शिवकन्या शिवानीताई देशमुख, प्रसिद्ध कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर, श्री राजू काळे ,ए. जे. फौंडेशन च्या प्रमुख अबोली जिगजिनी , संदीप पाटील, माजी आमदार राजू आवळे, राज्यभरातून आलेले सर्व पाहुणे, व सर्व स्वयंसेवक हे सर्व उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा