राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने नेत्र तपासणीचे रचनात्मक काम |
सौंदर्या पोवार : विशेष प्रतिनिधी
रुकडी : येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, रोटरी क्लब आॕफ इचलकरंजी सेंट्रल,रोटरी क्लब आॕफ गार्गीज कोल्हापूर , इचलकरंजी तहशील माहेश्वरी सभा ,दीपाली आॕप्टीशियन इचलकरंजी, नॕब नेत्र रुग्णालय मिरज आणि ग्रामपंचायत हेरले यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी, अल्प दरात चष्मे वितरण व अल्प दरात नेत्र शस्त्रक्रिया शिबिर हेरले ता. हातकणंगले येथे आयोजित करण्यात आले.
या शिबिरात एकूण ९७ स्त्री-पुरुषांच्या डोळ्यांची तपासणी नॕब नेत्र रुग्णालय मिरज आणि दीपाली आॕप्टीशियन इचलकरंजी येथील वैद्यकीय अधिकारी यांनी केली. गरजूंना अल्प दरात चष्मे उपलब्ध करुन देण्यात आले. तर १४ रुग्णांना नॕब नेत्र रुग्णालय मिरज येथे नेत्र शस्त्रक्रियासाठी पाठविण्यात आले. या शिबिर आयोजनामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त्त केले.
या शिबिर प्रसंगी सरपंच सौ.अश्विनी चौगुले , उपसरपंच श्री.फरीद नायकवडी, सदस्या सौ. निलोफर इब्राहिम खतीब, रो. यतिराज भंडारी, रो.राजू तारदाळे, रो. दीपीका कुंभोजकर, रो.अनघा पेंढारकर, रो.राजू थोरवत, बालकिशन टुवाणी, कमलकिशोर राठी, शिवप्रकाश बाहेती, मुरलीधर इनानी, लक्ष्मीकांत मालपाणी, पुरुषोत्तम जाजू, अशोक भूतडा, राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय रुकडीचे प्राचार्य डाॕ. प्रशांत कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डाॕ.गिरीश मोरे, डाॕ. अशोक पाटील, कु. ऋतुजा रघुनाथ जाधव हेरले ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजना व अन्य घटकांच्या माध्यमातून राबवलेल्या या उपक्रमाने हेरले व परिसरात लाभार्थ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा