Breaking

शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१

जयसिंगपूर कॉलेजमध्ये भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा ; भारतीय संविधान प्रत्येक भारतीयाचे सक्षम आधारवड : बाबासाहेब नदाफ

 

संविधान दिनानिमित्त उद्देशिका सामूहिक वाचन व व्याख्यान


मालोजीराव माने :  कार्यकारी संपादक


  जयसिंगपूर कॉलेजमध्ये राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान उद्देश पत्रिकेचा वाचन प्रमुख पाहुणे व वक्ते बाबासाहेब नदाफ यांचे संविधानावर परिपूर्ण भाष्य व मन परिवर्तन करणारे उत्तम भाषण तसेच  संविधान व बाबासाहेबांच्यावर आधारित राष्ट्रप्रेम व समाज परिवर्तन करणाऱ्या शाहीर रफिक पटेल यांच्या क्रांती गीताने कार्यक्रम परिपूर्ण झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुरत मांजरे होते.


   सुरुवातीस राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.के.डी.खळदकर यांनी उपस्थित मान्यवर घटकांचे स्वागत करून संविधान दिनाचा जागर करण्यासाठी परिपूर्ण वैचारिक मार्गदर्शन व क्रांती गीताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्यामध्ये संविधानिक मूल्ये  रुजविणे व  नवचैतन्य निर्माण करणे हा या  कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एन.एस. एस,कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने यांनी पाहुण्यांचे परिचय करून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असंख्य पैलूवर भाष्य करीत उपस्थितांच्या मध्ये उत्साह निर्माण केला.

     शुक्रवार दि.२६ नोव्हेंबर २०२१ रोजी जयसिंगपूर महाविद्यालयामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते मा.बाबासाहेब नदाफ, राष्ट्रीय संघटक राष्ट्र सेवा दल, यांनी  'संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान दिन साजरा करण्यासंदर्भातची पार्श्वभूमी मांडली. संविधान प्रस्तावना / उद्देशपत्रिका भारतीय राज्यघटनेचा सार असल्याचे सांगतिले.भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेत सर्वभारतीयांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक ,न्याय, विचार ,अभिव्यक्ती व विश्वास याबाबत उजागर केले. आपल्या संविधान निर्माणकर्त्यांनी संविधान इतर देशाप्रमाणे ईश्वराला अर्पित केले नसून ते समस्त भारतीयांना अर्पित केले आहे.तसेच भारताचे संविधान हे धर्मनिरपेक्ष असल्याबाबत त्यांनी सांगितले. संविधानाची सक्षमता मांडताना व सकल भारतीयांचा आधारवड कसा आहे हे पटवून देण्यासाठी त्यांनी काही ज्वलंत उदाहरणे दिली. बाबासाहेब नदाफ यांनी संविधानविषयक सत्य व वास्तव बाजू  मांडताना उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापक भारावून गेले होते.

        प्रसिद्ध लोकशाहीर रफिक पटेल यांनी  प्रेरणादायी क्रांतीगीते सादरीकरणाच्या माध्यमातून उपस्थितांच्या विचारांना नवसंजीवनी दिली. त्यांच्या या गाण्यांनी कार्यक्रमातील प्रत्येक घटक हा संविधानमय झाला होता.

     कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र. प्राचार्य मा.डॉ. सुरत मांजरे अध्यक्षीय मनोगतात म्हणाले ,संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले अधिकार व कर्तव्य याचे भान ठेवून प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागले पाहिजे. कारण लोकशाही सक्षम करण्यासाठी संविधान हा सर्वात महत्त्वाचा दस्तावेज आहे. त्यामुळे संविधान असेल तर  सक्षम लोकशाही सक्षम पर्यायाने देशातील प्रत्येक घटक सक्षम होईल.

      कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये बी.कॉम. भाग २ चा विद्यार्थी श्री .पेटकर समवेत उपस्थित सर्व विद्यार्थी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थी व उपस्थितांनी संविधान उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन केले.

      अंतिमतः या कार्यक्रमाचे उत्तम व नेटके आभार बी.ए.भाग -२ ची विद्यार्थिनी कु. श्रुती चव्हाण हिने मानले. या सुंदर व रचनात्मक कार्यक्रमाचे उत्तम व सूत्रबद्धरित्या सूत्रसंचालन बी.ए.भाग -२ ची विद्यार्थिनी कु. तेजल भोसले व कु. नेहा जाधव यांनी केले.

      या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे, सचेतन बनसोडे,उपप्राचार्य डॉ. सुनील बनसोडे, उपप्राचार्य आर.डी. तासगावकर,डॉ.एन.पी.सावंत,डॉ.आर.डी.माने,प्रा.सौ. सुपर्णा संसुद्धी,प्रा.संतोष डफळापूरकर,डॉ.वंदना देवकर व प्रा.चौगुले , व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याचबरोबर पुरोगामी चळवळीतील साथीदार घटक उपस्थित होते.

२ टिप्पण्या: