विद्यार्थ्यांचा कोविड लसीकरणाला वाढता प्रतिसाद |
जीवन आवळे : विशेष प्रतिनिधी
जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि प्राथमिक आरोग्य केंद्र जयसिंगपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक २५, नोव्हेंबर २०२१ रोजी "मिशन युवा स्वास्थ्य" अभियानांतर्गत महाविद्यालयीन स्तरावर कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी जे कोविड १९ प्रतिबंधात्मक लस घेतलेली नाही किंवा जे दुसऱ्या डोससाठी पात्र आहेत त्यापैकी आज रोजी ३९ जणांना कोविडशिल्ड लसीचे डोस देण्यात आले.
प्राचार्य डॉ. सुरत मांजरे व शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक प्रा.अभय जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कोल्हापूर जिल्हा समन्वयक प्रा.डॉ.संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली व इचलकरंजी विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.माधव मुंडकर यांच्या सहकार्याने दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहीम यशस्वी झाली.
सदर मोहिमेस प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ.पांडुरंग खटावकर, मा.सुनिल आलासकर, डाटा ऑपरेटर रोहित कट्टीमणी, सिस्टर सौ.मिनीता अहिरे व प्रा.मेहबूब मुजावर यांचे उत्तम सहकार्य मिळाले. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी ही मोहीम फत्ते करण्यासाठी सहकार्य केले. यामध्ये कु.नेहा राठोड,कु.कोमल मोहिते,कु.दिव्या रासुरे, श्री.प्रदुयन कांबळे, कु.निकिता सातपुते व श्री. गौरव पाटील या विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
सदर लसीकरण मोहीमेबाबत महाविद्यालयातील पात्र विद्यार्थी - विद्यार्थिनी व पालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
बहोत ही बढ़िया सर
उत्तर द्याहटवा