संग्रहित छायाचित्र |
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार ) सकाळी देशवासीयांना संबोधित करताना शेतकऱ्यांसाठी केलेले तीन कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली.
गेल्या वर्षी नोव्हेंबर पासून शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरु केले होते व अजूनही कायम आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली.शेतकऱ्यांच्या हितासाठी तीन कृषी कायदे आणले होते, पण त्यांच्या हितासाठी केलेल्या या कायद्याचे त्यांना फायदे दिसले नाही, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
या महिन्याच्या अखेरीस सुरु होणाऱ्या संसद अधिवेशन सत्रात तीन कृषी कायदे रद्द (Repeal) करण्याची संविधानिक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. अशी माहिती त्यांनी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा