श्रावणबाळ वृद्धाश्रम, अकिवाट |
मालोजीराव माने : कार्यकारी संपादक
अकिवाट : शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे श्रावणबाळ वृद्धाआश्रमास शिरढोणमधील ज्येष्ठ शिवसैनिक व माजी विभागप्रमुख मा.कुबेर चौगुले यांनी भेट दिली.सर्व निराधारांचे आशीर्वाद घेऊन कार्यक्रमास सुरवात झाली.यांच्याकडून वृद्धाआश्रमातील जेष्ठ निराधार नागरिकांना दोन वेळचे भोजन देऊन तसेच जीवनावश्यक वस्तूंची मदत करून वृद्धाश्रमातील वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचं काम केले.मुळात कुबेर चौगुले हे कुरुंदवाड परिसरातील एक संवेदनशील व्यक्ती म्हणून ओळखले जातात त्यांच्याकडून अशा प्रकारचे कार्य अविरतपणे सुरू आहे. याबाबत त्यांच्याशी बोलले असता ते म्हणाले, आपण मनुष्यप्राणी असल्यामुळे सामाजिकता भाव हा आपल्यामध्ये निसर्गताच असतो. त्यामुळे प्रत्येक घटकांने आपल्या आयुष्यात आपल्याला जमेल त्या पद्धतीने दुसऱ्यांचा चेहरा आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्याकडून अपेक्षा मात्र करू नये.
अन्नदान व जीवनावश्यक वस्तूंची मदत करताना त्यांच्याबरोबर ज्येष्ठ नागरिक दत्तू गुदले व त्यांचे सर्व कार्यकर्ते उपस्थित. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गुरुदत्त कारखान्यासमोर सद्गुरू बाळुमामा मंदिराजवळ सदर आश्रम असून आपण हे एक वेळ भेट देऊन त्यांच्या चेहर्यावर आनंद आणू शकता असे आवाहन या आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश सासणे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा