✍🏼 मालोजीराव माने, कार्यकारी संपादक
कोल्हापूर : कथा कादंबरीकार कालवश बळवंत/बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थी महाराष्टातील अकरा किल्ल्यांवर विसर्जित करण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून घोषित केले आहे. याला जनसंघर्ष सेना, कोल्हापूर यांनी तीव्र विरोध केला असून अस्थी पन्हाळापर्यंत पोहोचू न देण्याचा इशारा दिला आहे.
जनसंघर्ष सेनेचा जाहीरनामा |
केंद्र व राज्य सरकारच्या पुरातत्व खात्याच्या कायद्याप्रमाणे किल्ल्यांवर अस्थी विसर्जनाला बंदी असताना, तसेच छ. शिवाजी महाराज व जिजाऊ मासाहेब यांच्यावरील आक्षेपार्ह लिखाणामुळे अखंड शिवभक्तांची अस्मिता दुखावल्याने प्रचंड वादात असणारे कालवश बळवंत पुरंदरे यांच्या अस्थी रायगडासह इतर अकरा किल्ल्यांवर विसर्जित करण्याचा घाट घातला गेला आहे. हे कायद्याचे उल्लंघन असून या प्रकाराला जनसंघर्ष सेनेने तीव्र विरोध नोंदवला आहे. तसेच या अस्थी पन्हाळ्यापर्यंत पोहोचू न देता रोखण्याचा इशारा जनसंघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा.शुभम शिरहट्टी यांनी दिला आहे.
गडकिल्ले गंगेचा घाट नाही, शिवराय व त्यांच्या मावळ्यांच्या शौर्याच्या इतिहासाचे जिवंत प्रतीक आहे. अशा कायद्याचा भंग करणाऱ्या प्रकाराला जिल्हा प्रशासनाने तात्काळ पायबंद घालावा, अन्यथा पन्हाळ्यावर अस्थी नेण्यापासून रोखण्यात येईल.
- शुभम शिरहट्टी, अध्यक्ष जनसंघर्ष सेना.
या प्रकारामुळे जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असून प्रशासनाकडून वेळीच याची दखल घेण्याची गरज आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा