Breaking

सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

राज्यात येते ५ दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

 

संग्रहित छायाचित्र

     अरबी समुद्रात 17 नोव्हेंबरच्या आसपास  कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होणार आहे. त्यामुळे 14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

           हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोल्हापूर, सातारा, सांगली  रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, आणि सोलापूर जिल्हात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

 बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद परिसरात पुढे दोन दिवस पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. या जिल्ह्यांसाठी यलो अलर्टही देण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा