प्रा.चिदानंद अळोळी : नृसिंहवाडी प्रतिनिधी
आमच्या संस्थेच्या पाहणी नुसार अपघाताची गंभीरता आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेऊन तसेच १८ डिसेंबर २०२१ रोजीच्या दत्त जयंतीचा उत्सवाची पार्श्वभूमी लक्षात घेता शिरोळ ते नृसिंहवाडी या रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावे अशा प्रकारची मागणीचे निवेदन कृष्णा-पंचगंगा सेवा फाउंडेशनच्या वतीने देण्यात आले आहे.
या फाउंडेशनने निवेदनात असे म्हटले आहे की, जवळपास १ ते २ किलोमिटर रस्ता अर्धा अपूर्ण राहिला असून त्यात जनता हायस्कूल शिरोळ, मारुती मंदिर, औरवाड फाटा अशा बऱ्याच ठिकाणी काम अपूर्ण आहे. ह्या अपूर्ण कामामुळे अपघाताची संख्या खूप वाढत आहे. वाहतूक करणे अडचणीचे व धोकादायक बनले आहे.
दत्त जयंती निमित्त लाखो भाविक नृसिंहवाडीला दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे आपण दत्त भक्तांचा विचार करिता बोरगाव ते नृसिंहवाडी, शिरोळ व नृसिंहवाडी, गणेशवाडी ते नृसिंहवाडी तसेच बाकीच्या सर्व रस्त्याची पाहणी करून कुठे अडथळा व अपूर्ण काम कुठे असेल तर ते पूर्ण अथवा तात्काळ दुरुस्त करून घ्यावी व आपण संबंधित कंपनीला तात्काळ सूचना द्याव्यात अशी विनंतीवजा मागणी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मा. संतोष रोकडे साहेब यांना मिरज येथे कृष्णा पंचगंगा सेवा फौंडेशन तर्फे मागणीचे निवेदन देण्यात आले असून या निवेदनावर पदाधिकारांच्या स्वाक्षरी आहेत. हा रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून समस्त दत्तभक्त व नागरिकांच्या समाधान द्यावे ही अपेक्षा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा