गीता माने : सहसंपादक
ईश्वर साधना व आध्यात्मिक विचारातून माणसाचे जीवन समृद्ध होते, ईश्वर भक्तीचा व्यासंग मनाला आनंद व समाधान देत असतो.त्यामुळे जगण्यातील आनंद शोधला पाहिजे,सर्वत्र दीपावली साजरी झाली, पण निराश जीवनामध्ये आशेचा, उमंग उत्साहाचा , मन शांतीचा, मतभेद विसरून प्रेम मांगल्याचा व कर्म करताना खुशीचा दीपक अशा पाच गुणांची दिव्य स्मृती मनामध्ये सदैव जागृत ठेवणे म्हणजेच खरी दीपावली आहे असे मत ब्रह्माकुमारी सेवा केंद्राच्या पुणे विभाग क्षेत्रीय संचालिका सुनंदा बहेनजी यांनी केले.
येथील टारे क्लब हाऊस येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने शिवरचना वास्तु चा 10 वा वर्धापन दिन व सुनंदा बहेनजीं यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार असा संयुक्त कार्यक्रम झाला. यावेळी प्रबोधन करताना त्या बोलत होत्या,
यावेळी बोलताना सुनंदा बहेनजी म्हणाल्या, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय या वास्तूमध्ये दिल्या जाणाऱ्या ईश्वरीय ज्ञान व मेडिटेशनमध्ये सहभाग घेऊन सर्वांनी जीवन सुख ,शांतीमय बनवावे,
या कार्यक्रमास दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, शिरोळ नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, शिवप्रतिष्ठानचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई, मेडिकल असोसिएशन अध्यक्ष डॉ वीरश्री पाटील, नगरसेवक पंडित काळे, दत्त कारखाना संचालक अनिलराव यादव, सामाजिक कार्यकर्ते दगडू माने, माजी सरपंच दरगू गावडे, धनाजी पाटील- नरदेकर, गुरुराज हिरेमठ यांच्यासह ब्रह्माकुमारीचे कोल्हापूर, सांगली व रत्नागिरी जिल्ह्यातून 500 हून अधिक भाऊ-बहीण उपस्थित होते. आशा बहेनजी यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन रश्मी बहेनजी यांनी केले. शिरोळ सेवा केंद्र संचालिका मनिषा बहेनजी यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा