महसूल सहायक रमेश दगडू राठोड याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. हातकणंगले तहसील कार्यालय परिसरात ही कारवाई करण्यात आली.
संशयित आरोपी रमेश राठोड |
हातकणंगले. ( कोल्हापूर ) - तक्रारदाराची वर्ग २ ची जमीन वर्ग १ करण्यासाठी कागदपत्रात नोंदिमध्ये इनामी जमीन असा शेरा आवश्यक होता. तो शेरा देण्यासाठी संशयित आरोपी रमेश राठोड यांनी तक्रारदाराला ३ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर २५०० रुपयांना तो तयार झाला. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केल्यानंतर विभागाने सापळा रचून संशयित आरोपी रमेश राठोड यास हातकणंगले तहसील कार्यालय परिसरात रंगेहाथ पकडले.
उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीश मोरे, सहायक फौजदार संजीव बंबर्गेकर, कृष्णात पाटील, नवनाथ कदम, सुनील घोसाळकर इत्यादींनी ही कारवाई केली.
Photo source - Lokmat
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा