Breaking

सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१

लोकशाही सक्षम करण्यासाठी १८ वर्षावरील प्रत्येक नागरिकांनी नवमतदार म्हणून नोंदणी करणे आवश्यक : प्र.प्राचार्य डॉ.प्रशांत कांबळे*

 

नवमतदार जनजागृती साठी आवाहन करताना प्राचार्य डॉ. प्रशांत कांबळे


सौंदर्या पोवार : विशेष प्रतिनिधी


रुकडी : लोकशाही बळकट करण्यासाठी १८ वर्षावरील प्रत्येक नागरिकांनी आपले नाव मतदार यादी मध्ये सामाविष्ट करणे गरजेचे आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरिकास मतदानाचा हक्क दिला आहे.तो हक्क बजावणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. हे लक्षात ठेवून १८ वर्षावरील प्रत्येक विद्यार्थ्याने महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मतदार नोंदणी अभियान राबविले जात आहे, त्यास योग्य प्रतिसाद देऊन मतदार  नोंदणीचा विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह वेळेत  भरून द्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ.प्रशांत कांबळे यांनी केले.ते येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय, रुकडी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित केलेल्या मतदार नोंदणी जनजागृती अभियान कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते.     

         सदर कार्यक्रम स्वागत व प्रास्तविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. गिरीश मोरे यांनी केले. यावेळी श्री. अमर बुल्ले व डॉ. उत्तम पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले

        कार्यक्रमाचे नेमकेपणाने आभार प्रदर्शन डॉ. खंडेराव शिंदे यांनी मानले तर उत्तम पद्धतीने सूत्रसंचालन डॉ.अशोक पाटील यांनी केले.

      कॉलेजच्या या समाजाभिमुख उपक्रमाने समस्त विद्यार्थी वर्गात आनंद व समाधान व्यक्त केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा