घोडावत कन्या कॉलेजमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा |
मालोजीराव माने : कार्यकारी संपादक
जयसिंगपूर : लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या येथील श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालयात '२६ नोव्हेंबर' हा 'संविधान दिन' मोठया उत्साहात रचनात्मक उपक्रमांनी संपन्न झाला.
महाविद्यालयातील एन.एस.एस व एन.सी.सी विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आतिष फौंडेशन, सांगली यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन पटाचे दर्शन घडवणारे दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन पोलिस उपअधिक्षक रामेश्वर वैजने यांच्या हस्ते करण्यात आले.
संविधान दिनी महाविद्यालय प्रांगणात विद्यार्थिनींनी अत्यंत सुंदर व अप्रतिम रांगोळी काढली होती. उपअधिक्षक रामेश्वर वेंजने यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन करून सुशिक्षित होण्यापेक्षा शिक्षित, ज्ञानी होणे गरजेचे आहे. त्यातील समानता, दर्जा व संधी याविषयी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर या संविधानामुळेच सर्वांचे आयुष्य परिपूर्ण होते. तसेच मा.वैंजने साहेब या पुढे म्हणाले की, विद्यार्थिनीनी शिक्षण घेत असताना शिक्षणावर अधिक लक्ष केंद्रित करून करीअर घडवावे. आई वडिलांचा आशीर्वाद व विश्वास संपादित करून जीवन फुलवावे. टपोरी मुलांच्या अधीन होऊन आपले आयुष्य स्वाधीन करू नये.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. डी. बी. कर्णिक यांनी मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर २५ नोव्हेंबर दिवशी विद्यार्थिनींना मतदार नोंदणीचे आवाहन केले. झेंडा दिवसाचे औचित्य साधून निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोरोनाच्या काळातील महायोद्ध्यांचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे आभार कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.गौतम ढाले. यांनी मानले.
या प्रसंगी जयसिंगपुर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मा.राजेंद्र मस्के, अमरदिप कांबळे, रमेश जाधव, दिनेश गोटे, राकेश खाडे, प्रीतम देमापूरे, इंगळे, प्रा.डॉ.आर.डी.माने, प्रा.डॉ.प्रभाकर माने आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा. डॉ. पंडीत वाघमारे, प्रा. डॉ. उमाजी पाटील, प्रा. डॉ. संदीप रावळ, कु. समृध्दी पाटील व कृष्णा कोळी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे नेमके व उत्तम नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. गौतम ढाले, प्रा.डॉ.सौ.माधुरी शिंदे व एन.सी.सी.ऑफिसर प्रा.सौ.पद्मजा पाटील व ज्युनिअर विभाग मुजावर यांनी केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील असंख्य प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.
घोडावत कन्या कॉलेजने संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या या रचनात्मक कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा