Breaking

बुधवार, १ डिसेंबर, २०२१

*जयसिंगपूर गुन्हे शोध पथकाकडून दोन घरफोडीचे गुन्हे उघड : पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी*


जयसिंगपूर गुन्हे शोध पथकाने अटक केलेले गुन्हेगार

*रोहित जाधव : शिरोळ तालुका प्रतिनिधी*


          जयसिंगपूर पोलीस ठाणे हद्दीतील असलेले दोन घरफोडीचे गुन्हे जयसिंगपूर गुन्हे शोध पथकाकडून उघड करण्यात आले.मा. पोलीस अधीक्षक श्री शैलेश बलकवडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या घरफोडी गुन्ह्यांना प्रतिबंध करणे बाबत तसेच माला विरोधीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे सदर दोन गुन्हे दाखल झाले होते.

       सदर गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने मा.पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी सदर घडलेले गुन्हे उघडकीस आणणे बाबत गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आदेशित केले होते. त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकातील पोलिस सबइन्स्पेक्टर प्रमोद वाघ, पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावाळे, पोलीस कॉन्स्टेबल भोसले यांनी सदर गुन्ह्याचे अनुषंगाने पोलिस ठाणे हद्दीतील सीसीटीव्ही फुटेज तसेच मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित इसम नामे आरमान अजित बैरागदार  वय वर्षे 20 राहणार उदगाव ता.शिरोळ जि.कोल्हापूर, असलम दस्तगीर नदाफ वय वर्षे 21 रा.जयसिंगपूर ता. शिरोळ जि. कोल्हापूर या विरोधी संघर्ष बालक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केले असता वरील इसमांनी सदरचे दोन गुन्हे केल्याचे कबूल केले आहे.

        सदर  चोरीस गेलेला 14 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस अंदाजे किंमत ₹ 30000/- चे विकत घेतले बद्दल मारुती व्यंकाप्पा चव्हाण रा. लमानी वसाहत धरणगुत्ती ता. शिरोळ जि. कोल्हापूर याला गुन्ह्याच्या कामी ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज केले आहे.

    सदर आरोपी यांनी गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर गाडी क्रमांक एम एच 12 एन डब्ल्यू 64 61 अंदाजे किंमत 40 हजार व जिओ कंपनीचा मोबाइल अंदाजे किंमत एक हजार रुपये असा एकूण 71 हजार रुपयांचा मुद्देमाल सदर आरोपी त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे.

       सदरची कारवाई मा.उपविभागीय पोलिस अधिकारी जयसिंगपूर विभाग श्री रामेश्वर वैंजने ,मा.पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के जयसिंगपूर यांचे मार्गदर्शनाखाली जयसिंगपूर पोलीस ठाणे कडील पोलीस सब इन्स्पेक्टर प्रमोद वाघ,पोलीस सब इन्स्पेक्टर अजित पाटील, सहाय्यक फौजदार चळचूक, पोलीस नाईक पटेल, पोलीस नाईक कांबळे, पोलीस नाईक बने व पोलीस कॉन्स्टेबल भोसले यांनी केलेले आहे.

      पोलिसांच्या या उत्तम कामगिरीने जयसिंगपूर पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा