Breaking

शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०२१

शिरोळ येथील शिवभोजन थाळीचे विशेष कौतुक*

  

शिवभोजन थाळी, शिरोळ


प्रा.चिदानंद अळोळी  : नृसिंहवाडी प्रतिनिधी


     महाराष्ट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सर्वात महत्वकांक्षी योजना म्हणून शिवभोजन थाळी कडे पाहिले जाते .ज्यांच्याकडे स्वत:चे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराधार, बेघर नागरिकांना रोजच्या जेवणाची सुविधा शिवभोजन थाळी योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध करून देण्यात आली आहे.राज्यातील सर्वच शहरांमध्ये शिवभोजन थाळी केंद्र सुरू असून, शिरोळातही शासनाचा हा उपक्रम माऊली हॉटेल तर्फे मोफत शिवभोजन वाटप केलं जात आहे.


           या *शिरोळ मधील शिवभोजन थाळी मध्ये विशेष म्हणजे पंजाबी रोटी चा समावेश असल्याने सर्वच जण याच विशेष कौतुक करत आहेत*या थाळीत  2 चपाती अथवा 2 रोटी चा असा पर्याय ठेवलाय तसेच  भाजी, भात,आमटी,लोणचे, कांदा इत्यादी या पदार्थाचा समावेश सुद्धा आहे .

 *माऊली चे प्रमुख श्री विठ्ठल पाटील* यांनी संगीतले की शिवभोजन थाळी ही गोरगरीब लोकांना खूप मोठा आधार आहे व भुकेल्याला अन्न अश्या उपक्रमात आपल्यावर सुद्धा मोठी जबाबदारी आहे म्हणून त्यांनी या थाळी मध्ये पंजाबी रोटी चा पण पर्याय ठेवून गरिबांना सुद्धा अश्या पदार्थाचा लाभ मिळावा म्हणून सुरू केले आहे , दररोज 75 शिवभोजन थाळी रुपये 10 प्रमाणे याचे वाटप केले जाते .


शिरोळ मधील माऊली शिवभोजन थाळीचे शिरोळसह परिसरात खूपच कौतुक होत आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा