Breaking

शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०२१

जयसिंगपूर ; चक्क दुसऱ्या मजल्यावर निघाला घोणस जातीचा विषारी साप. अँनिमल सहारा फाऊंडेशनचे प्राणीमित्र अक्षय मगदूम व यश मगदूम यांनी केला रेस्कु

 

संग्रहित छायाचित्र

जयसिंगपूर -  येथील यशवंत हौसिंग सोसायटी ( नवीन कोर्टाच्या मागे ) येथे प्रमोद नांद्रे यांच्या घरी वरच्या मजल्यावर विद्यार्थी राहत असलेल्या खोलीत दिनांक ११ नोव्हेंबर रोजी रात्री किचनमधे घोणस जातीचा विषारी सर्प निघाला. 

   घरात साप निघाल्याची बातमी समजताच घरमालक प्रमोद नांद्रे यांनी अँनीमल सहारा फाउंडेशन चे सदस्य सर्पमित्र अक्षय मगदूम यांना संपर्क साधला. तात्काळ सर्पमित्र अक्षय मगदूम व यश मगदूम यांनी तिथे पोहचून तो विषारी घोणस जातीचा साप पकडला . तसेच त्या घोणस सापासोबतच इतर सापांचीही माहिती उपस्थित नागरिकांना दिली.


 थंडीच्या दिवसात प्रामुख्याने विषारी घोणस साप घराच्या आसपास पाहायला मिळतात, तसेच थंडीचा नोव्हे. ते मार्च हा काळ घोणस सापाचा मिलन काळ असल्याने या काळात तो जास्त आक्रमक असतो. तरी कोणत्याही प्रकारचा साप दिसल्यास त्वरित सर्पमित्रांशी संपर्क करा.


        प्राणीमित्र अक्षय मगदूम, सदस्य अँनिमल सहारा फाउंडेशन


घोणस सापाबद्दल अधिक माहिती, 


Source - सर्पतज्ञ राहुल शिंदे, बुक

      रेस्क्यू केलेला घोणस जातीचा साप वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आला.

अँनिमल सहारा फाउंडेशन
संपर्क - +91 99223 03712 ( सदस्य ,अक्षय मगदूम)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा