Breaking

बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

त्रिपुरा येथील जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात जमावबंदी : जिल्हाधिकाऱ्यांची आदेश


मा. जिल्हाधिकारी ,सांगली 


सांगली : त्रिपुरा येथील जातीय दंगलीचे पडसाद जिल्ह्यात उमटू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे त्यासाठी मंगळवारपासून ५ दिवस जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. फौजदारी प्रक्रिया सहिता कलम 144 अन्वये ही  कार्यवाही केली जाणार असून त्याआधी सांगली शहरात पोलिसांनी संचलन करून इशारा दिला आहे.           

    रजा अकादमीने १२ नोव्हेंबर पुकारलेल्या बंद दरम्यान घडलेल्या घटनेचे प्रतिसाद उमटून महाराष्ट्रात अमरावती, नांदेड, मालेगाव,पुसद व कारंदा या ठिकाणी जातीय हिंसाचार घडला आहे.यापूर्वीची सांगलीची पार्श्वभूमी पाहता सांगली जिल्ह्यामध्ये या गोष्टीचा फायदा घेऊन काही समाज कंटक गटामध्ये जातीतील निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थल सीमा हद्दीतील दिनांक 15 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 6 पासून 20 नोव्हेंबर मध्ये रात्री 12 पर्यंत पाच किंवा 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येणे तसेच सहभाग घेणे तसेच शस्त्र व लाठीकाठी बाळगण्यास प्रतिबंध केला आहे. दरम्यान दंगलीच्या या प्रकरणाच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठान तर्फे आज निदर्शने होणार होती त्याला परवानगी नाकारण्यात आली त्याच ठिकाणी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या अस्थिकलश दर्शनाची व्यवस्था याठिकाणी करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाने या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा