माजी खासदार मा. राजू शेट्टी यांच्या हस्ते जयसिंगपूर कॉलेज (NSS) एन.एस.एसचा गौरव |
*प्रा. चिदानंद अळोळी : विशेष प्रतिनिधी*
जयसिंगपूर : स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, जयसिंगपूर ता.शिरोळ जि. कोल्हापूर या संस्थेने जयसिंगपूर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेने कोरोना महामारीच्या काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कार्यक्रमाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे माजी खासदार मा.राजू शेट्टी यांच्या हस्ते कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ.प्रसाद संकपाळ (कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी) व संस्थेचे अध्यक्ष एजाज मुजावर यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
पुरस्कार वितरण सोहळ्यातील काही क्षणचित्रे |
शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे संचालक प्रा. अभय जायभाये यांच्या नेतृत्वाखाली 'माझं गाव कोरोनामुक्त गाव' मोहिम शिवाजी विद्यापीठामार्फत शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्रत्येक महाविद्यालयाद्वारे दत्तक घेतलेल्या गावात सुरू केले होते. त्यासंदर्भात जयसिंगपूर कॉलेजचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.प्रभाकर माने व स्वयंसेवक विद्यार्थी यांनी मा. प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली ७ गावे दत्तक घेऊन ऑनलाइन पद्धतीने व वेळेप्रसंगी ऑफलाइन पद्धतीने कोरोना महामारीला अटकाव करण्यासाठी व प्रबोधनात्मक कार्य तसेच विद्यार्थ्यांना कोविड लसीकरण मोहिमेसाठी प्रवृत्त करणे त्याचबरोबर लसीकरण करून घेणे या कामी केलेल्या कार्याची दखल घेत स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूरच्या राष्ट्रीय सेवा योजनेस मा.खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते हे कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रभाकर माने,प्रा.मेहबूब मुजावर,जीवन आवळे, गणेश कुरळे, सौरभ शेट्टी, मंथन महिंद व अन्य स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी कोरोना काळात केलेलं काम कौतुकास्पद होते. माजी खासदार मा.राजू शेट्टी यांनी आपल्या भाषणात जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्याचा उल्लेख केला.
जयसिंगपूर कॉलेज राष्ट्रीय सेवा योजनेने केलेल्या कामगिरी व मिळालेल्या सन्मान पत्राचे सर्वत्र कौतुक होत आहे. कॉलेजच्या प्र. प्राचार्य डॉ.सौ.मनिषा काळे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांचं कौतुक करून अभिनंदन केले व पुढील सेवाभावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
हार्दिक अभिनंदन
उत्तर द्याहटवाCongratulation of NSS Tem for great work in Vivid -19 pandemic Period
उत्तर द्याहटवाCongratulation All NSS Sutdent for good work in Covid -19 pandemic Period
उत्तर द्याहटवा