Breaking

बुधवार, ८ डिसेंबर, २०२१

जयसिंगपूर' येथे स्व.दि.ब.आण्णासाहेब लठ्ठे यांची १४३ वी जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ; विद्यार्थ्यांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

मा.प्र.प्राचार्य डॉ.डी. बी. कर्णिक यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार होताना

मालोजीराव माने : कार्यकारी संपादक


जयसिंगपूर : लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगलीच्या श्रीमती गंगाबाई खिवराज घोडावत कन्या महाविद्यालय, जयसिंगपूर येथे वक्तृत्व स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी संस्थेती जवळ जवळ सर्व विद्यालय, ज्युनि. कॉलेज, डिप्लोमा, डी.एड. व महाविद्यालयांनी उत्स्फुर्तपणे भाग घेतला.

           कन्या महाविद्यालयामध्ये ९ डिसेंबरच्या स्व दिवाणबहादूर आण्णासाहेब लठ्ठे जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन युव्हीजी हॉलमध्ये कार्यशील प्र. प्राचार्य डॉ. डी. बी. कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आले. या वक्तृत्व स्पर्धा १. इ. ५वी ते ७ वी २. इ. ८वी ते १०वी ३ इ. ११ वी ते १२वी व ४. डी. एड. व महाविद्यालय या चार गटामध्ये पार पडल्या.

        यामध्ये स्व. दि. ब. आण्णासाहेब लठ्ठे, कोरोना,महापूर, प्रसार माध्यमे प्रदुषणमुक्त भारत आदि विविध विषयावर विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या वक्तृत्वातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यासाठी संस्थेच्या विविध शाखेतून आलेल्या परिक्षकांनी परिक्षण केले. त्यानंतर लगेच समापन समारोह कार्यक्रमामध्ये सर्व गटातून आलेल्या प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय कमाक व उत्तेजनार्थ विद्यार्थिनींना रोख बक्षिसे देवून त्यांना प्रोत्साहन दिले.

       या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन मा. शांतीनाथ कांते ,मानद सचिव मा. सुहास पाटील व सचिव आजीव सभासद समिती मा. एस. बी. चौगुले यांची प्रेरणा व मार्गदर्शन मिळाले. वक्तृत्व स्पर्धेचे समन्वयक म्हणून डॉ. बी. एस. पाटील यांनी नियोजन केले. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांचे सहकार्य लाभले.

      जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या वकृत्व स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्वर्गीय अण्णासाहेब लठ्ठे यांच्या विचारांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा