Breaking

मंगळवार, ७ डिसेंबर, २०२१

जयसिंगपूर मधील लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल मधून चोरट्याने पैसे घेऊन केला पोबारा ; पोलीस यंत्रणा सतर्क

 

लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल मध्ये चोरी


प्रविणकुमार माने : उपसंपादक


जयसिंगपूर : जयसिंगपूर शहरातील शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेली संस्था दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलमध्ये  चोरट्यांनी १लाख १२ हजार रुपयाची चोरी करून पळून गेला आहे. या घटनेने जयसिंगपूर शहरात एकच  खळबळ माजली आहे.

      नांदणी रोड लगत असणाऱ्या मालू हायस्कूल मध्ये सदर घटना ४ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० ते दिनांक ५ डिसेंबर रोजी  सकाळी ६.३० वाजण्याच्या कालावधीत घडली आहे. याबाबत शाळेचे वरिष्ठ लिपिक सतीश सदाशिव कुकडे वय ४० राहणार गल्ली नंबर १८ जयसिंगपूर शिरोळ-वाडी रोड यांनी फिर्याद दिली आहे.

     पोलिसाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार,लक्ष्मीनारायण मालू हायस्कूल मध्ये  अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून शाळेचे ऑफिस मधील टेबलच्या ड्रॉवर उचकटून ड्रॉवरमधून कपाटाची चावी घेऊन कपाट उघडून यामधील रोकड १ लाख १२ हजार रुपये चोरून नेली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत भोसले यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या अनुषंगाने माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्या भागात ठिकाणातील सीसीटीव्ही फुटेज  तपासण्याचे काम सुरू असून या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक अंजली बने करीत आहेत.

        या घटनेने जयसिंगपूरकराच्या मनात चोरटा कोण आहे? तो कधी सापडणार? याविषयी उत्सुकता आहे. असे असले तरी दुसऱ्या बाजूला शिक्षणाच्या पवित्र मंदिरात चोरी होणे हे लांच्छनास्पद आहे अशी चर्चा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा