कार्यक्रमात मार्गदर्शन करताना उद्योजक बी.के वैकटेश |
तेजल भोसले : विशेष प्रतिनिधी
रुकडी : येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन व सेवायोजन समिती आणि स्वयंनिर्भर अभ्यासक्रम समन्वय समिती तसेच रोटरी क्लब ऑफ गार्गीज कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या "उद्योजकता विकास कौशल्य" या विषयावरील व्याख्यानात श्री. बी.के. व्यंकटेश बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते श्री. बी.के. व्यंकटेश बोलताना म्हणाले, प्रत्येक व्यक्त्तीकडे कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या क्षमता असतात, त्या क्षमता आपण ओळखल्या पाहिजेत त्या क्षमतांचा विकास करून केवळ नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरु करा. नोकरीपेक्षा व्यवसायातून प्रगती होते, पण आपण व्यवसायामध्ये जाण्याचे धाडस करीत नाही. नोकरी स्वतःसाठी करतो पण व्यवसाय हा पुढच्या पिढ्यांसाठी असतो. आज देशात जे मोठे उद्योजक आहेत त्यांच्या उद्योगाची सुरुवात ही छोट्याशा उद्योगातून झालेली आहे असे मत श्री. बी.के. व्यंकटेश यांनी व्यक्त्त केले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.शर्मिला साबळे यांनी केले. यावेळी सौ. तेजस्विनी व्यंकटेश व रो.गौरी शिरगावकर यांनीही मनोगत व्यक्त्त केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे म्हणाले, महाविद्यालयीन शिक्षणाबरोबरच छोट्या-मोठ्या व्यवसायाचे शिक्षणही आपण घेतले पाहिजे, आपण मनात आणले तर अशक्य ते शक्य करून दाखवण्याची क्षमता आपणाकडे असते फक्त्त गरज आहे ती प्रयत्नांच्या पराकाष्टाची आहे.
या कार्यक्रमाचे सुंदर आभार कु. सुयेशा नांगनुरकर हीने मानले. उत्तम सूत्रसंचालन कु.तैसीन खतीब हिने केले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्याची निश्चितच प्रेरणा मिळाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा