Breaking

मंगळवार, २८ डिसेंबर, २०२१

*कॅप्टन प्रा.शंकर केशव माने यांनी भूगोल विषयातून संपादन केली शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. पदवी*

 

कॅप्टन प्रा. केशव माने  यांनी केली पीएच.डी. पदवी संपादित


*मालोजीराव माने  : कार्यकारी संपादक*


इस्लामपूर : इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे भूगोल विभागाचे विभाग प्रमुख व सहयोगी प्राध्यापक एन.सी.सी.अधिकारी कॅप्टन प्रा.शंकर केशव माने यांना शिवाजी विद्यापीठाकडून  शैक्षणिक सर्वोच्च पीएच.डी. पदवी जाहीर झाली. त्यांनी प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली “इम्पॅक्ट ऑफ कृष्णा-कोयना लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट ऑन एग्रीकल्चर इन सांगली डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्रा : ए जॉग्रफिकल अनालिसिस” या विषयावर पीएच.डी.चे संशोधन कार्य पूर्ण केले. डॉ.शंकर माने यांचे हनमंतवडीये ता. कडेगाव  हे गाव असून  त्यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होवून शोध निबंध सादर केले आहेत . 

         तसेच एन.सी.सी.च्या माध्यमातून रक्तदान शिबिरे, प्रबोधन फेरी,पर्यावरण जनजागृती, वाहतूक सुरक्षा, राष्ट्रीय एकात्मता, स्वच्छ भारत अभियान ई. विविध सामाजिक उपक्रम कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये यशस्वीरीत्या राबविले आहेत. डॉ. शंकर माने यांच्या या यशाबद्दल महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या जनरल सेक्रेटरी मा. सरोज नारायण पाटील (माई), अध्यक्ष मा. एन.आर. पाटील (काका), प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांनी हार्दिक अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

      कॅप्टन डॉ. केशव माने हे महाविद्यालयातील एक विद्यार्थीप्रिय, शिस्तबद्ध व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. सामाजिक संवेदनशीलता जपत त्यांनी एनसीसी च्या माध्यमातून सातत्याने राष्ट्रनिर्माण कार्यासाठी सेवा केली आहे.

      कॅप्टन प्रा.केशव माने यांनी संपादन केलेल्या पीएच.डी .पदवीने त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

1 टिप्पणी: