डॉ.जे जे मगदूम कॉलेजमध्ये इंडक्शन प्रोग्राम |
मालोजीराव माने : कार्यकारी संपादक
जयसिंगपूर : डॉ.जे.जे.मगदूम कॉलेज ऑफ इंजीनियरिंग जयसिंगपूर मध्ये नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला सामाजिक चेहरा व संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी AICTE च्या अंतर्गत इंडक्शन प्रोग्रामच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभिक या कार्यक्रमातील मान्यवर साधन व्यक्ती अर्थात प्रमुख वक्ते यांचे स्वागत करून प्रास्ताविकात प्रा.प्रकाश चौगुले म्हणाले, नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग व तांत्रिक विषयाच्या ज्ञानाबरोबर सामाजिक सजगता येण्यासाठी म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा हेतू आहे.
या कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात जयसिंगपूर कॉलेजचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.के.डी.खळदकर यांनी मानवी हक्क व संविधानिक मूल्ये याबाबत सखोल व विस्तृत विवेचन करीत वास्तव उदाहरणाच्या माध्यमातून विविध कलमासह मानवी हक्क व मूल्ये कायद्याची जाणीव करून दिली. यामधून विद्यार्थ्यांना प्राथमिक माहिती व ज्ञान प्राप्त व्हावे ही अपेक्षा होती.
यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये जयसिंगपूर कॉलेज अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर माने यांनी 'भारत : आजच्या तरूणाईचे वास्तव आणि अपेक्षा' या विषयावर विस्तृत मांडणी केली. मानवी विकास निर्देशांक, जागतिक आनंद निर्देशांक व जागतिक युवा विकास निर्देशांकाच्या माध्यमातून भारताचे सद्य परिस्थितीतील वास्तव स्थान स्पष्ट करून भारताच्या विकासाचे खरं स्वरूप स्पष्ट केले. या मध्ये आजच्या तरुणाईची वास्तव परिस्थितीची मांडणी करून राष्ट्र विकास व उत्थानासाठी तरुणाईकडून कोणत्या अपेक्षा आहेत हे ही नमूद केले. यासाठी त्यांनी शिक्षणातून लोक सहभाग- लोकसहभागातून शिक्षणाची अपेक्षा व्यक्त केली.
या अभ्यासपुर्ण इंडेक्शन प्रोग्रॅमचे आभार प्रदर्शन प्रा. प्रकाश चौगुले यांनी केले. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. सौ.एस.बी.पाटील मॅडम व कॉलेजचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस. एस. आडमुठे यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे उत्तम नियोजन समन्वयक प्रा.डॉ.एस.एम.अत्तार व प्रा.एम.बी.भिलवडे F.Y.B.Tech विभागाचे विभाग प्रमुख यांनी केले. या कार्यक्रमास प्रा.शिंदे, प्रा. नाईक मॅडम व इतर स्टाफ उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळालेल्या वैचारिक व अभ्यासपूर्ण मांडणीचे विद्यार्थी घटकांकडून कौतुक व समाधान व्यक्त केले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा