मातोश्री फाउंडेशनच्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धा |
कोथळी : मातोश्री सोशल फाउंडेशन कडून नाताळ निमित्य भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आर्मी भरती व पोलीस भरती सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी भव्य अशा १६०० मीटर स्पर्धेचे व लहान गट २.५ किलोमीटर अंतरावरील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
१६०० मीटर धावणे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शिरदवाडचा ओमकार कुंभार, राहणार द्वितीय क्रमांक अकोल मडावी (आर. बी. स्पोर्ट) जयसिंगपूर, तृतीय क्रमांक ओंकार नलवडे (आर. ए. स्पोर्ट्स) इचलकरंजी व चतुर्थ क्रमांक जयसिंगपूरचा सोहम कोळी या स्पर्धकांनी सुयश संपादन केले आहे.
त्याचबरोबर लहान गट मुली २.५ कि.मी. धावणे स्पर्धेमध्ये वैष्णवी कुंभार, (नॅशनल स्पोर्टस) उमळवाड हिने प्रथम क्रमांक पटकावला असून, स्नेहल खरात राहणार सिद्धेवाडी हिचा दुतिय क्रमांक व भक्ती मगदूम (नॅशनल स्पोर्ट) उमळवाड तृतीय क्रमांक मिळविला आहे.
लहान गट मुले २.५ कि.मी.धावणे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अनिकेत शिनगारे नाना रूकडी, द्वितीय क्रमांक राहुल लवटे रा.इचलकरंजी, तृतीय क्रमांक शेखर पडियार रा. जयसिंगपूर या सर्व स्पर्धकांनी लहान गट मुले धावणे स्पर्धेमध्ये यश संपादन केले आहे.
सदरच्या कार्यक्रमाचा पारितोषिक वितरण समारंभ युवानेते मा. श्री अजय पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते स्पर्धेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अजय पाटील-यड्रावकर यांनी मातोश्री सोशल फाउंडेशने आयोजित केलेल्या स्पर्धेचे कौतुक केले. तसेच भरतीसाठी तयारी करणाऱ्या कष्टाळू व मेहनती विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन केलेबाबत मातोश्री सोशल फाऊंडेशन ही सेवाभावी वृत्तीने उत्तम कामगिरी करणारी संस्था असल्याचे उदगार त्यांनी काढून इथून पुढे असेच समाजहिताचे कार्य करावे अशा शुभेच्छा ही संस्थेस दिल्या.
यावेळी सहकार विश्वस्त मंडळ शिरोळचे अध्यक्ष मा.श्री संजय नांदणे यांनी मातोश्री सोशल फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करीत हे फाउंडेशन सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारी संस्था असल्याचे उद्गार त्यांनी काढून त्यांनी मातोश्री संस्थेच्या कार्य उल्लेखनीय प्रेरणादायी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले व मातोश्री सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष जीवन आवळे यांना असेच समाज हितासाठी कार्य करावे अशा शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य नितीन वायदंडे सदस्य, शरद कांबळे, मा. सदस्य रवी पुजारी, आरोग्य सेवक राहुल गवळी,अशोक गांजे, हर्षल यादव, शहाजी बिरंगे, संदीप कांबळे, दादा तिवडे, रोहन पाटोळे, संदीप मोरे, देवा ठोंबरे, राजू बिराजदार, आदेश तिवडे, सुनिल आवळे, शशिकांत घाटगे व जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरचे एन.एस.एस(NSS) विभागातील स्वयंसेवक विद्यार्थ्यांसह क्रीडा शौकीन व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर स्पर्धेच्या आयोजनाबाबत क्रीडाप्रेमी व गावकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा